Monday, June 15, 2020

Jaipur trip

२२ ते २६ जानेवारी २०१६ या काळात आम्ही जयपूर ट्रीप केली. माझी पहिली मोठी ट्रीप ती सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर होत होती. मला urticaria चा खूप त्रास व्हायचा. बाहेरचे खाणे पिणे मी टाळायचो.अशा अवस्थेत निघताना खूप टेंशन होते.कसे निभावेल याचे.मला दिवसभर rashes येत असत.हाता पायांची आग होत असे.तरीही धाडसाने ठरवले की जायचेच.

२२ जानेवारी ला लोकल ने कुर्ला आणि तिथून टॅक्सी करून बांद्रा टर्मिनस गाठले.हा फोटो तिथला आहे.माझ्या कडे कॅमेरा फोन नव्हता.डिजिटल कॅमेरा ixus 160 होता.त्याने अंदाजाने ही selfi काढलेली. राजस्थान म्हणजे थंडी असेल तसेच ट्रेन मध्ये पण AC असेलया हिशोबाने स्वेटर कानटोपी वगैरे बरीच तयारी घेऊन गेलो होतो.


संध्याकाळचे ७ वाजले होते.आणि गुजरात राज्यात आम्ही दाखल झालो होतो. हा फोटो अशाच एका स्टेशनवर (वापी असेल) घेतला. फोटो मध्ये आहेत सिद्धेश,वरुण आणि नेमाडे. पण पूर्ण ट्रिपमध्ये मी फक्त आणि फक्त नेहल सोबतच राहिलो. बाकीच्या लोकांची नाडी जुळली नाही. त्यांचे विषय वेगळेच होते.ज्यात मला interest नव्हता. मी माझी हौस भागवली.


Monday, August 26, 2019

Mahuli Picnic (GCCE)

गेले काही दिवस चित्त थार्‍यावर नाही. कसलीतरी भीती वाटते. anxiety असते. आईबाबा आणि त्यांचे वागणे-बोलणे हे प्रामुख्याने त्याला जबाबदार आहे.असो. अशा मानसिक अवस्थेत एका mad mad picnic ची अत्यंत गरज होती. ती काल रविवार दि. २५/८/२०१९ ला पूर्ण झाली. माहुली ट्रीपच्या रूपात. काहीही करून मला desperately जायचंच होतं. मी नुसताच जाऊ शकलो नव्हे तर पुर्णपणे मजा करून शकलो. जे फोटो काढायचे होते ते काढू शकलो याचं खूप समाधान आहे. २ गाड्या भरून १०० च्या आसपास मुलं आणि teachers होते. सकाळी ७ वाजता निघालो. आधारवाडी junction वरुन कल्याण-सापे मार्गे तळेले गाठले. तिथे मुंबई-आग्रा national highway ने पडघा वाशिंद करत जोंधळे इंजीनीरिंग कॉलेज वरुन मानस मंदिर रोड मार्गे माहुलीला पोहोचलो. सकाळचे ९ वाजलेले. कृष्णामामा आगीवले यांच्याकडे पोहयांचा नाश्ता केला. त्यानंतर १० वाजता trail ला सुरुवात केली. १२ वाजता trail संपला. मुलांना वनस्पती आणि कीटक यांची माहिती देण्यात आली.  मी जानेवारी २०११ साली माहुली ट्रेकला आलो होतो. त्यानंतर एकदा picnic आणली होती. ट्रेकनंतर ८ वर्षानी आलो. खूप बदल जाणवत होते. नव्याने सर्व-भाविक भक्त निवास बांधण्यात आले आहे. तिथून पुढे माहुलीवरून येणार्‍या प्रवाहांपैकी एक प्रवाह आहे.(19.469648,73.266340) गेले काही दिवस पाऊस नसल्यामुळे त्याला बेताचेच पाणी होते. त्यामुळे मुलांनी त्याच्यात मनसोक्त आनंद घेतला. अक्षराश धुमाकूळ घातला. मुलं आरडाओरडा करत होती. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होती. बुळबुळीत दगडावरून धडाधड पडत होती. छोट्या छोट्या ride तयार झालेल्या वाहत्या पाण्याच्या.त्याच्यात वाहून जाण्याचा आनंद घेत होती. २ तास मनसोक्त डुंबल्यावर भूक लागली. मग परत कृष्णामामा यांच्या घरी जेवण होते. २ भाज्या,पोळ्या, कोशिंबीर, २ गुलाबजाम,आमटी-भात असे साधेसुधे असे जेवण होते. ते झाल्यावर परत फिरायला बाहेर पडलो. जवळच एक quary आहे जी वनखात्याने बंद केली.(19.467826,73.268199) तिथे एक तलाव होता. त्याच्या आसपास timepass केला. ४ वाजले होते. परत कृष्णामामा यांच्या घरी  आलो. मुलांना २/२ वडापाव दिले. परतीच्या प्रवासाला निघालो. येताना बापगाव मार्गे आलो. रात्री ८ वाजता घरी सुखरूप पोहोचलो.
विशेष गोष्टी :
माझ्या ओळखीची फार कमी मुलं होती. तरीही माला जमवून घेण्यात अडचण आली नाही. आदित्य बोटकोंडले,शुभम यमग, ओजस, रिद्धी पाटील, श्रेयसी बापट, रोहित सागवेकर हेच ओळखीचे होते. आदित्य आपल्या गावाचे आणि त्याच्या family मधल्या सगळ्या श्रीमंतीचे वर्णन सांगत होता. he is a fun guy and very much interesting and funny.
quary च्या ठिकाणी आदिती आणि अक्षता आणि अजून ३ जणी ज्यांची नावं देखील माला माहीत नाहीत अशा ५  जणी started talking on various topics and started making lots of fun. अक्षता आणि आदिती यांनी कृष्णामामा यांच्या घरी पोलवर ओळखीम्बे घेतले. माझ्याशी बोबडं बोलत होत्या. ते भारी होतं. एक मुलगी तिच्या आई आणि आजीचे fundae संगत होती. red leggings वाली मुलगी दुसरं असं सांगत होती. एक मुलगी rocks वरून adventure करत होती.
परतातना मुलांना भूतांच्या गोष्टी सांगितल्या.










Friday, June 10, 2011

मी पाहिलेले किल्ले

मी पाहिलेले किल्ले
१ कोरीगड
२ लोहगड
३ तुंग
४ तिकोना
५ घनगड
६ तेलबैला
७ रवळ्या
८ जावळ्या
९ मार्कंडा
१० माणिकगड
११ अलिबाग चा किल्ला
१२ कोर्लई
१३ अर्नाळा
१४ गंभीर गड
१५ भूपत गड
१६ यशवंत गड,रेडी
१७ निवती
१८ सिंधुदुर्ग
१९ विजयदुर्ग
२० भरतगड
२१ भगवंतगड
२२ गोवळकोट
२३ पूर्णगड
२४ रत्नदुर्ग
२५ जयगड
२६ गोपाळगड
२७ जंजिरा
२८ मानगड
२९ चौल्हेर
३० अशेरीगड
३१ तांदुळवाडी
३२ कर्नाळा
३३ सोनगिरी
३४ कोहोज
३५ सुरगड
३६ मृगगड
३७ कामणदुर्ग
३८ निमगिरी
३९ जीवधन
४० बसगड
४१ हरिहर
४२ हर्णे
४३ बाणकोट
४४ कातळधार धबधबा
४५ ठाणाळे लेणी
४६ कलावंतीण सुळका
४७ पेठ
४८ राजगड
४९ शिवनेरी
५० चावंड
५१ यशवंतगड,राजापूर
५२ आंबोळगड
५३ खांदेरी
५४ सोनगिरी,पळसदरी
५५ ईर्शाळगड
५६ मंगळगड
५७ हडसर
५८ ब्रम्हगिरी-दुर्ग भंडार
५९ घोशाळगड
६० बिरवाडी
६१ पारसिक
६२ आजोबा
६३ सोनगड
६४ पर्वतगड
६५ डुबेरगड
६६ तळेग़ड
६७ मांदाड लेणी
६८ सज्जनगड
६९ पद्मदुर्ग
७० नाखिंड
७१ माहुली
७२ अशेरी
७३ पदरगड
७४ गोपाळगड(२८ मे २०११)

Thursday, June 2, 2011

माझी कोकण यात्रा मे २०११

२१ मे
पहाटे ५ ला घर सोडले.NH-17 वर drive करताना जी मजा येते ती काय ती फ़क्त मला आणि रोहितलाच माहीत.महाड माणगाव परिसरात शेतीची कामे चालू होती.थोडेसे फ़ोटॊ काढुन पहिला पडाव गाठला....घोणे काष्ठशिल् संग्रहालय,कोलाड..........रमेश घोणे या कलाकाराने काष्ठशिल्पांच्या सहाय्याने निसर्गाच्या विवि पैलूंचं घडवलेलं दर्शन थक्क करुन टाकतं.निसर्गप्रेमी रसिकांसाठी ही पर्वणीच आहे.१० रु चे माफ़क तिकिट आहे आणि photography मोफ़त आणि मनसोक्त करु शकतो.लाकडापासून बनवलेल्या बाहुल्या,चेहरे,टेलीफोन,table lamps,wall paintings,कासव,मोठा बूट,कुलुप,हत्ती,कंदील अशा वस्तू बघुनच गम्मत वाटते.बाळासाहेब ठाकरे,पु.ल.,येशू यांची शिल्पेही येथे बघायला मिळतात.
दुसरा पडाव होता......उमरठ.....तान्हाजी मालुसरे आणि शेलारमामा समाधी.पोलादपूरपासून किमी वर अंबेनळी घाटाच्या रस्त्याने कापडे फाटा लागतो.इथे डावीकडे वळुन एका घाटरस्त्याने आपण उमरठला पोहोचतॊ.वाटेत डावीकडे सावित्री धरण लागते.सिंहगडावर तान्हाजी मालुसरे यानी देह ठेवल्यावर त्यांचे शव मढ्या घाटाने उमरठला आणण्यात आले आणि तिथे नंतर त्यांची समाधी बांधण्यात आली.उमरठ गावी ग्राम पंचायतीने समाधी स्थळ बांधले आहे.याच ठिकाणी शेजारी जननी कुंभळजा देवीचे मंदिर आहे.येथुन थोडे पुढे गेल्यावर तान्हाजींचा पुतळा बसवलेले ठिकाण आहे.या ठिकाणच्या झाडाच्या ढोलीत काही शस्त्रे सापडली.त्यापैकी काही पुण्याच्या केळकर संग्रहालयात आहेत व २ तलवारी येथील शेजारच्या घरातले रहिवासी रामचंद्र पोकळे(कदम) यांच्याकडे बघायला मिळतात.या ठिकाणी जवळ डोंगरात निसर्गनिर्मित गुहा आहे.पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात येत आहे.या कामी ग्रामपंचायत सदस्य कळंबे यांच्या पुढाकाराने सुषमा स्वराज यानी १५ लाख देणगी दिली अशी पोकळे यानी माहिती दिली.जवळच ढवळे गाव आहे.चंद्रगडाच्या पायथ्याचे हे गाव आहे.पुतळ्याच्या ठिकाणाहून चंद्रगडाचे दर्शन होते.तसेच महाबळेश्वरच्या arthur seat point चे ही दर्शन होते.
तिसरा पडाव होता......कशेडी घाटाच्या माथ्यावरचा अक्कलकोट महाराजांचा मठ........येथुन कशेडी घाटाचे विहंगम दृश्य मन मोहून टाकते.थोडावेळ विश्रांती घेउन आणि थंडगार कोकम सरबताचा आस्वाद घेउन पुढच्या प्रवासाला निघालो.
चौथा पडाव............all time favorite.......श्री देव परशुराम मंदिर,चिपळुण..........यावेळी मंदिराला जायच्या चिपळुण कडच्या प्रवेशद्वाराने निघालो.हा रस्ता मंदिराच्या आवाराजवळ आपल्याला घेउन जातो.देवाचे दर्शन घेउन आणि २ ग्लास सोलकढी घश्याखाली उतरवून पुढे निघालो dream destination कडे................गुहागर............वाटेत रस्त्यावर tp photo session करुन तब्बल १२ तासानी गुहागर गाठले.संध्याकाळी सागर किनारे थोडं photo session करुन रात्री आईबाबांशी गप्पा मारत आणि हापूस आंब्यांवर ताव मारत जेवण केलं आणि झोपेच्या आहारी गेलो.

२२ मे

विश्रांतीचा दिवस.वाडीत आणि समुद्रावर फोटोसेशन करण्यात दिवस घालवला.paddy मामाला फोन करुन २३/२४ मे ची व्यवस्था करुन ठेवली.साधारण plan डोक्यात होता.


२३ मे

पहाटे ६ वाजता निघालो रत्नागिरीकडे.यावेळी राई-भातगाव पुलामार्गे आणि मग आरे-वारे पुलावरुन रत्नागिरी असा बेत ठरवला.रोहिले-तवसाळ भाग बघितला नसल्यामुळे तो बघायचीउत्सुकता होती.पालशेत सोडलं आणि पाउस शिंतडायला सुरुवात झाली.थोडा वेळ एका park केलेल्या रिक्शेत आडोसा घेतला.पाउस लगेच थांबला.पुढे निघालो.थोड्या वेळाने रोहिल्याच्या निसर्गरम्य अशा परिसरात पोहोचलो.संदर असा छोटासा समुद्र्किनारा,समोर जयगडचा जिंदालचा power project आणि सुंदर असा पूल.मनसोक्त फोटो काढले आणि पुढे निघालो.आदल्या रात्री या भागात पाउस झाल्यामुळे रस्ते,डोंगर ओले झाले होते.अशा रस्त्यावरुन फ़ेरफ़टका म्हणजे एक रोमान्सच आहे.काही वेळातच तवसाळच्या माळावर पोहोचलो.इथे थोडे landscapes मारुन तवसाळ गावात निघालो.रस्त्यावरच उजवीकडे विजयगडाचा बुरुज दिसतो.विजयगडाचा मोह आवरुन गावात पोहोचलो आणि पडावाची(बोट) चौकशी केली.एका गावकरयाने "८ वाजता आहे" असे सांगितले.पडाव पलिकडे जयगड गावात जातो असेही सांगितले.एक तास थांबण्यापेक्षा भातगाव पुलावरुनच जावे असे ठरवून परत फ़िरलो भातगावच्या दिशेत.इथे कुडली आणि पडवे अशी गावे लागतात.त्यापैकी पडवे गावातून डिपको मिळतात पण 2 wheelar जाउ शकत नाही तिथपर्यंत.त्यामुळे कुडलीला जायचे ठरवले.तवसाळच्या माळावर कुडली गाव लागते.अत्यंत टुमदार असे हे गाव.landscapes साठी अतिशय संदर ठिकाण.या गावी गवताची "उडवी" बघायला मिळाली.भात झोडपल्यानंतर या उडव्यांमध्ये साठवले जाते.एकेका उडवीत ७००/८०० किलो धान्य राहू शकते.amazed to know this!!ही सर्व माहिती दीपक गडदे यानी उपलब्ध करुन दिली.कोकणात ठिकठिकाणी रस्त्याच्या बाजुला झेंडे खोवलेली ठिकाणे दृष्टीस पडतात.इथे लोक नवस बोलतात.काही दगड रचून त्यात झेंडे उभे करतात.काही ठिकाणी झाडावर झेंडे लावतात.कुडलीत खाली जेट्टीपर्यंत पोहोचलो.पलीकडे समोर कुडली-जांभारी आणि उजवीकडे धाकटी जांभारी अशी गावे दिसतात.या ठिकाणी जयगड खाडी यु टर्न घेते ते स्पष्टपणॆ दिसू शकते.५ मिनिटात आपण पलिकडे पोहोचतो.३० रु तिकिट आहे(bike साठी) आणि डिपको सकाळी ६.१५ ते संध्याकाळी ६.३० चालु असते.अगदी पावसातही.(contact person कन्हैया तरवाला,कुडली(८९७५५९३५७७/8975593577) आरे-वारे पुलावरुन जायचा बेत असल्यामुळे गाडी नेवरे मार्गे रत्नागिरी रस्त्यावर घातली.वाटेत २ गावकरी भेटले.त्याना रत्नगिरी पर्यंत लिफ़्ट दिली.त्यामुळे आरे वारे रस्त्यावर त्यावेळी photo session करता नाही आले.पण त्याच रस्त्याने परतायचे असल्यामुळे निर्धास्त होतो.१० वाजता रत्नागिरीत पद्माकर मामाकडे दाखल झालो.इडलीचा नाश्ता followed by "अतिथी" भोजनालयातले उत्तम जेवण......It was treat.मामा १ मे ला रत्नागिरी दूरदर्शन केंद्रामधून voluntary घेउन retire झाला.त्यामुळे he was free. संध्याकाळी ४.३० ला रत्नदुर्ग पहायला बाहेर पडलो.रत्नदुर्ग अतिशय सुंदर.भगवती मंदिर,नर्मदा सीमेंटची जेटी,कडेलोट point,light house सगळे कसे रम्य.भरपूर फोटो काढुन मग मांडवी बंदरावर पोहोचलो.तिथे भेळ followed by नारळपाणी.once again it was treat.मांडवी बंदर काही मला तितकेसे आवडले नाही.एक तर "चौपाटी" झाली आहे आणि त्यात गर्दी.त्यामुळे जीव घाबराघुबरा होतो.

मामाच्या घराच्या व्हरांड्यात चिमण्या,साधे कावळे,जंगली कावळे,साळुंख्या येत असतात.त्यांचे थोडे फोटॊ काढले.मागच्या फ़णसावर कोकीळ-कोकीळा,बुलबुल वास्तव्य करतात.वर्षातून दोनदा ससाणा येतो.सगळी मज्जाच मज्जा.दिवस मजेत गेला.

Friday, May 6, 2011

माहुलीला घडलेला अप्रिय अपघात

व्यक्तींची नावे बदलली आहेत.प्रसंग खरा अहे.

३१ मे १९९७

"सह्यमित्र" संस्थेचा ग्रुप ट्रेक होता माहुलीला.महेश होता लीडर.महेश आणि ग्रुप शिडीच्या वाटेने वर जाणार होते.महेशच्या काही मित्रानी कल्याण दरवाज्याने वर चढायचे ठरवले.महेशने त्याना विनंती केली की ग्रुप ट्रेकला तुम्ही असं करू नका.इतर वेळी ठीक आहे.पण म्हणतात ना गोष्टी घडायच्या असल्या की घडतातच.एकुण ६ जणानी कल्याण दरवाजा रूट घ्यायचे ठरवले.त्यांच्या मधे एक अगदी नवीन ट्रेकर आणि एक मुलगीही होती.रूट आहे तसा अवघड.जंगलातून वाटा सापडत नाहीत आणि मधे येणारे rock patches त्यामुळे सहसा त्या वाटेने कुणी जात नाहीत.पण...........

प्रकाश आधी महेश लाच join करणार होता.पण काही कारणामुळे त्याला जामले नाही आणि त्याने त्या ६ जणाना join व्हायचे ठरवले.प्रकाश तसा अनुभवी ट्रेकर.या आधी त्याने अलंग मदन कुलंग केले होते आणि काही ट्रेक तर अगदी एकट्याने सुद्धा.ट्रेकला अगदी sleepers सुध्दा घालत असे तो.यावेळीही त्याने sleepers घातल्या होत्या बहुदा.भविष्य बघायचा त्याला छंद होता.का कुणास ठाउक पण तो म्हणत असे "मी अल्पायुषी आहे".गम्मत म्हणुन असेही म्हणे की "मरण यावं तर किल्ल्याच्या सान्निद्ध्यात".

एव्हाना महेश किल्ल्यावर पोहोचला होता.किल्ला सगळा बघुन झाला आणि भटोबा pinnacle च्या बाजुच्या पठारावर चहा चा बेत करण्यात आला.कल्याण दरवाजा जवळपासच असल्यामुळॆ सर्व जण त्या ७ जणांची वाट बघत होते.

प्रकाश आणि इतर ६ जण सकाळी निघाले असावेत बहुतेक.वाटा मिळणे अवघडच जात होते.आणि त्यात ३१ मे चा दिवस.उन नुसते रणरणत होते.तहान तहान होत होते.आणलेले थोडेफ़ार पाणी लगेच संपले होते.कधी एकदा वरच्या ग्रुपला भेटतोय असे प्रत्येकाला वाटत होते.आणि त्यात अगदी नवख्या माणसाला त्या रूट ने आणणे म्हणजे ट्रेक लीडरवर दडपण होतेच.लीडर अर्थातच प्रकाश होता.अनुभवी होता ना तो.सर्व अडथळे पार करत ते ७ जण तुटलेल्या पायरया आहेत तिथपर्यंत येउन पोहोचले.इथे एक अवघड असे एक वळण घ्यावे लागते.patch च्या वर एक टेपाड आहे.त्यावर पिवळे गवत माजले होते.प्रकाश एकटाच मागे राहिला होता कशामुळे तरी.बाकीचे ६ जण कसा बसा तो patch पार करुन कल्याण दरवाज्यात पोहोचले सुद्धा.प्रचंड तहान लागली होती त्याना त्यामुळे वर जायचे त्राण उरले नव्हते.त्यातला एक जण वर चढुन आला महेश कडे आणि सगळ्याना पाणी घेउन परत कल्याण दरवाज्यात गेला.एव्हाना प्रकाश patch जवळ पोहोचला होता.वरुन महेश आणि मित्र त्याला बघु शकत होते.प्रकाश टेपाडापर्यंत पोहोचला.आणि त्याने पिवळ्या गवतावर पाय ठेवला आणि............काही कळायच्या आतच तो त्या गवतावरुन घसरला........इथुन खाली ५०० फ़ूट fall आहे...........महेश ने प्रकाशला कड्यातून निसटताना आणि खाली दरीत कोसळताना पहिले आणि प्रकाश दिसेनासा झाला........महेशच्या पोटात धस्स झाले.पण तो काय समजायचे ते समजुन चुकला होता.कल्याण दरवाज्यातल्या कोणालाही याची जरासुद्धा कल्पना नव्हती.

महेशला आता पटापट निर्णय घ्यायचे होते.घटना समजताच ट्रेक तिथेच cancel करण्यात आला.सर्वजण शिडीच्या वाटेने खाली उतरले.त्याना ट्रेन ने घरी पाठवण्यात आले.आता प्रकाश चा शोध घ्यायचा होता.तो वाचण्याची शक्यताच नव्हती.rescue साठी आणि जर काही कमीजास्त झाले असले तर tyachI body शोधण्यासठी ropes आणि ५/६ climbers ची टीम आणण्यासाठी महेश कल्य़ाण ला पोहोचला.सगळ्याना फ़ोन करण्यात आले.फ़क्त प्रकाशच्या घरी काही कळवण्यात आले नाही.दुसरया दिवशी सकाळी सर्वजण माहुलीला पोहोचले.गावकरी मदतीला घेउन बरयाच प्रयत्नांनंतर प्रकाशचा छिन्नविच्छिन्न झालेला देह त्यांच्या हाती लागला.देह फ़ुगला असल्यामुळे बराच जड झाला होता.कसाबसा तो माहुली खालच्या गावात आणण्यात आला.गावकरी तयार होइनात.त्याना दारु पाजण्यात आल्यानंतरच त्यानी तो खाली आणला होता.तिथुन body शहापूर ला हलवण्यात आली.तिथे तिचे nominal post mortem करण्यात आले आणि नंतर dead body प्रकाश च्या घरी भांडुपला नेण्यात आली.अजुनही शोकांतिकेचा अंत झाला नव्हता.जिल्हा बदलला की death चे पेपर्स verify करावे लागतात त्यामुळे स्मशानात ते विचारण्यात आले.मग राजावाडी hospital मधे जाउन सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर तब्बल ७२ तासांनंतर प्रकाशच्या देहाला अग्नी मिळाला.

आदल्या दिवशी महेशने प्रकाशच्या वडिलाना फ़ोन केला."काका एक अपघात घडलाय प्रकाशला.आपल्याला शहापूरला जायचय." वडील म्हणाले "महेश....खरं काय ते सांग.तो गेलाय का?".....महेश ला काय बोलायचं ते सुचत नव्हत....जड अंत:करणाने तो म्हणाला "हॊ"........काय अवस्था झाली असेल त्या वडिलांची?..........

सर्वच जणांसाठी..........नातेवाईक,मित्र,ट्रेकर्स.....सगळ्यांसाठी अतीशय ह्र्दयद्रावक आणि दु:खद अशी ही घटना घडली.

हा एक अपघात होता.पण तरीही...........

माझी सर्व ट्रेकर्स ना कळकळीची विनंती आहे की या घटनेपासुन बोध घेउन काही मूलभूत नियम जर सर्वांनी पाळले तर अशा घटना टाळता येतील.....

wish U all happy and Safe trekking.........

Life is precious......value it and enjoy..........

Monday, May 2, 2011

सांधण चा फ़ट्टांग ट्रेक

माहुली,अशेरी आणि पदरगडाच्या ट्रेक नंतर एप्रिल महिना उकाड्यामुळे आणि ट्रेक मित्रांच्या वैयक्तिक कारणांमुळे ट्रेक शिवायच गेला।:( त्यामुळे re re shedule करत सांधण valley चा ट्रेक एकदाचा १ मे ला ठरला.पंकजचा blog वाचला होता आणि महिनाभर google map,picassa albums आणि जिथे जिथे माहिती मिलेळ तिथुन भरपुर वाचलं होतं.त्यामुळे सांधण valley त जायची प्रचंड उत्सुकता होती.
३० एप्रिलला २७ जणांची jumbo team डोंबिवली हुन रात्री १२ वाजता निघाली.आयत्या वेळी अजय ऐवजी रोशनी आणि महेन्द्र ऐवजी वैभव अशा replacement झाल्या.सुनिल शिंदेला मानगड नंतर ५/६ वर्षांनंतर भेटत होतो.त्यामुळे भरपुर गप्पा मारल्या.त्यामुळे सब बेटे "नाराज" हो गये....:( मित्रा नितेश मला माफ़ कर.अशी चूक मी परत करणार नाही.!!!कसारा घाटात चहा साठी थांबलो आणि मग पहाटे ५ वाजता घाटघर धरणाजवळ आश्रमशाळेत पोहोचलो.पब्लिक झोपी गेलं आणि मी,प्रणय,निरु आणि सुनील थोडावेळ फ़ेरफ़टका मारला आणि निसर्गाचा आस्वाद घेतला.८ वाजायच्या सुमारास इडलीचा नाश्ता करुन २ किमी वर असलेल्या साम्रद गावात पोहोचलॊ.थोडावेळ फ़ोटो सेशन करुन सांधणकडे कूच केले.खुट्टा सुळका,रतनगड,अलंग,मदन,कुलंग सगळॆ धुक्यात लपले होते.साधारण ४५ मिनिटे चालल्यानंतर एका तुटलेल्या कड्याच्या टोकाशी पोहोचलो.इथुन सांधण valley च्या बाजुला असलेल्या मिनी कोकणकड्याचे रौद्रभीषण दर्शन घेता येते.आजोबा डोंगर,करोली घाट,सीतेचा पाळणा,रतनगड,खुट्टा सुळका,बाण सुळका यांचे दर्शन डोळ्यांचे पारणे फ़ेडुन जाते.सगळ्यांनी अगदी झोपुन झोपुन खालच्या valley चे आणि fall चे डोळे गरगरवून टाकणारे दर्शन घेतले.कड्याच्या जवळूनच exposed route वरुन सांधण valley च्या कोकणात उघडणारया तोंडाशी पोहोचलो आणि valley चे वरुन दर्शन घेतले.तिथुन परतुन valley च्या जवळुनच चालत valley च्या तोंडाशी पोहोचलो जिथुन आत प्रवेश करता येतो.

सांधण valley हा निसर्गाचा चमत्कार आहे.कातळामध्ये निसर्गनिर्मित एक प्रचंड भेग तयार झाली आहे. साधारण २०० फ़ूट खोल अशी ही भेग आहे.सुरुवातीला ती १५/२० फ़ूट आहे आणि मग वाढत जाउन ती १०० फ़ुटापर्यंत open होत जाते.पावसात valley च्या दोन्ही भिंतींवरुन पाणी आत पडते आणि त्यामुळे आतमध्ये पाण्याची pockets तयार होतात.हे पाणी बर्फ़ासारखे थंड असते.आम्हाला अशी २/४ pockets लागली.त्यातल्या एका pocket मधून जावेच लागते.या pocket मध्ये मे महिन्यात सुद्धा छातीभर पाणी होते.या pocket ची लांबी साधारण २०/२५ फ़ूट आहे.पाणी म्हटल्यावर दंगा होणारच आणि तसा तो झाला सु्द्धा.दोन्ही कडयातून सुटलेले कातळकडे आतमधे पडतात त्यामुळे सांधणच्या बेस ला छोट्यामोठया आणि काही अशा दगडगोट्यांचे bed तयार झाले आहे.काही शिलाखंड तर अजस्त्रच आहेत.प्रचंड आकाराच्या या शिलाखंडामधुन वाट काढत काढ valley च्या अर्ध्यापर्यंत पोहोचलो.इथुन खाली पुढे जात येते पण अगदी तळाशी गेल्यावर ५० फ़ूट तुटलेला कडा आहे तो रोपनेच उतरता येतो.त्यामुळे तिथेच थांबलो.या ठिकाणी २०/२५ जण बसतील एवढी प्रचंड शिळा आहे त्यावर सर्व जण बसलो आणि त्या valley च्या सौंदर्यात जणुकाही सामवुन गेलो.१५ मिनिटांच्या विश्रांतीनंतर सर्वजण तो १/१.५ किमीचा Bed पार करत बाहेर आलो.valley च्या तोंडाशी पिण्याच्या पाण्याचे छोटेसे pocket आहे तिथे थांबुन पाणी पिउन विसावा घेतला आणि परत निघालो साम्रदकडे.बाहेर पडल्या पडल्या रतनगड आणि खुटटा धुक्यातुन बाहेर पडलेले असल्यामुळे स्पष्ट आणि फारच मनमोहक दिसत होते.दूरवरचे अलंग,मदन,कुलंग सुद्धा उठून आले होते.साम्रद गावातल्याच एका शाळेच्या ओसरीवर ठेपले,कोथिंबीर वड्या,दही,केक असे मस्त जेवण घेतले आणि सांधण च्या आठवणी मनात साठवत ९ वाजता डोंबिवलीला पोहोचलो.

Tuesday, April 5, 2011

आठवणी तुझ्या........

पावसातल्या सातपुलाची

गरमागरम भज्यांची

चिकन आणि सुरमईची

आठवण येते।

लांब हाताच्या शर्टची

हडसरच्या रेकीची

कानातल्या लांब ear ring ची

आठवण येते।

गणपतीतल्या राणीची

वाढदिवसाच्या केकची

बुंदीच्या कळ्यांची

आठवण येते।

लाल रंगाच्या चपलांची

घारया भेदक डोळ्यांची

तुझ्या "अय्या हो का" ची

आठवण येते।

तू रंगवलेल्या गणपतीची

तुझ्या कलरफ़ुल छत्रीची

उसळ आणि पोळीची

आठवण येते।

spanish च्या levels ची

नाकातल्या रिंगची

ठसठशीत ओठांची

आठवण येते।

पहाटे ५.३० ची

गावाहून केलेल्या फोनची

आ वासलेल्या बुटाची

आठवण येते।

तुझ्या विचित्र वागण्याची

तुझ्या मिश्किल हसण्याची

तुझ्या देवभोळेपणाची

आठवण येते।

अशाच आठवणी काढताना

काहीतरी केव्हातरी कुठेतरी

***

तुझी आठवण येते।

Friday, March 25, 2011

पदर गडचा थरार

पदरगड(कलावंतिणीचा महाल)
उंची-६१० मी(२००२ फ़ूट)
जवळचे गाव-खांडस

भीमाशंकर ल़ा कोकणातुन दोन वाटा आहेत.एक आहे गणेश घाट आणि दूसरी शिडी घाट.त्यापैकी गणेश घाटाने जायच्या रस्त्यावर पदरगडाकडे जायची वाट आहे.जीतू आणि वैभव आधीच pilot trek करून आलेले असल्यामुळे रस्ता माहित झाला होता.खांडस ल़ा पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारात गाड्या park केल्या.रोहित मिलिंद अगोदरच येउन पोहोचले होते.आमचा पहिला पड़ाव होता गणेश मंदिर जे २ किमी वर होते.सकाळच्या वेळी खांडस गावातून जायचा आनंद काही वेगळाच होता.साधारण १ १.१५ तासाच्या चालीनंतर आम्ही गणपती मंदिरात पोहोचलो।
गणपती मंदिर छोटेसे आणि कौलारू आहे.मंदिराच्या आवारात बसून इडली चा नाश्ता केला.आणि पुढे पदरगडाच्या वाटेला लागलो।
साधारण ४५ मिनिटांच्या नंतरच्या प्रवासात एक माळरान लागले आणि आम्ही दुसऱ्या पडावाशी पोहोचलो.तो पड़ाव आहे एक विहीर.भीमाशंकर किंवा पदरगडाच्या trek मध्ये ही विहिरच पाण्याचा source आहे.पोटं आणि बाटल्या पाण्याने भरून घेतल्या.येथून पदरगडाकडे जायचा मार्ग वर जंगलात चढतो.हा टप्पा घसारायुक्त,छोट्या कातळ टप्प्यांचा आणि रोमांच आहे.साधारण १ तासाच्या चढणीनंतर आम्ही चिमणीत पोहोचलो.हे पदर गडाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.२ माणसे जेमतेम उभी राहू शकती इतकीच ती जागा आहे.दोन्ही हात आणि पाय यांचा वापर करून वर चढलो.आणि तेथून पदर चा rock patch येतो.patch आहे छोटासाच पण मजा येते चढताना.patch संपला की थोडासा घसारायुक्त मार्ग लागतो आणि आपण पदरगडावर पोहोचतो.वर पोहोचल्यावर एक छोटीशी गुहा लागते.त्या गुहेत विसावा घेतला आणि जेवण सुद्धा.या गुहेशेजारून वर चढायला पायरया आहेत.त्या चढू गेल्यावर आपण पदर गडाच्या पहिल्या भिंतिशी पोहोचतो.या भिंतीच्या डावीकडून पलिकडे गेल्यावर आपण दुसऱ्या भिंतिशी पोहोचतो.या भिंतीच्या पायथ्याशी कडेकडेने exposed route ने आपण मोठ्या गुहेत पोहोचतो.या गुहेतून शिडी वाट,भीमाशंकर चे नागफणी टोक असे विहंगम दृश्य दिसते.

Tuesday, March 15, 2011

Once upon A time in Dombivali

कुम्पणावरून उडी मारली आणि मी "प्रभात पार्क" मध्ये प्रवेशकर्ता झालो.उडी मारली तीच मुळी सीमेंट आणि वाळूत.पक्याच्या दारावरची बेल वाजवली तेव्हा शेजारच्या मद्राशिणीकडे "घरफोड़ी" चालू होती.नितिनने(पक्याचा लहान भाऊ) दरवाजा उघडला आणि आत पाय ठेवताक्षणीच अवेळी "entry" घेतल्याची जाणीव.....छे छे.....पक्की खात्रीच माला झाली.आत शिरतो तोच माझ्या उजव्या हाताला आणि सोफ्याच्या डाव्या हाताला "सोना" बसली होती.माझ्याकडे एक कटाक्ष टाकुन परत ती आपल्या मांडीवर तान्ह्या पोराप्रमाणे घेतलेल्या कागदाच्या बाडावर "रे"घोटायला लागली."सोना" म्हणजे सोनाली.पक्या झुनझुनवाला सोडून MCC मध्ये आला त्या....हो हो त्या दरम्यानच बहुतेक सोनाली च "सोना" झालं असणार! मग पक्याने माझी ओळख तिला पटवून द्यायचा प्रयत्न केला.तो ही कसा तर "अग हाँ.......ह्याला तू ओळखलं असशिलच चेहेरयावरून" आता ओळख अशी का करून द्यायची?नीट सांगायचं की हा अमुक अमुक.त्या १० मिनिटांच्या कालावधीत आम्ही चौघानी बऱ्याच प्रकारचे आव आणण्याचा प्रयत्न केला.त्यात "सोना" न बोलून शहाणी ठरली.मी तिला काहीतरी विचारायचे म्हणून "चित्र बित्र काढत्येस की काय? " असा निरर्थक आणि त्या वेळेला "doesn't required" असा प्रश्न केला.तिने माला तोंडातल्या तोंडात पुटपुटत काहीतरी उत्तर दिले.ते मला समजले आहे असा मी चेहेऱ्यावर भाव आणला.पक्या तिला एकसारखा "ऐ तू आत जा ना" असं का आर्जवत होता हे मात्र उलगडल नाही.मग पक्याने गाण्यांची एक लिस्ट दिली आणि "मी ह्यातल कुठलही गाऊ शकतो" अस उगाचच सांगीतल.मग मीही त्याची परतफेड म्हणून हारमोनियम वर उगाचच सुर काढले।
"सोना पक्या के घर में??" या पक्यारणाच ...ohhh sorry.....प्रकरणाच गूढ़ उकलत "कबाब में हड्डी" न बनता,खोळंबायचं असून सुद्धा नाइलाजास्तव मी आणि नितिन घराबाहेर पडलो आणि रवीच्या रस्त्याला आणि नादाला लागलो.

सत्यघटनेवर आधारित.........इमारती व माणसे यांची नवे बदलली आहेत..........:)

Monday, October 4, 2010

कास पठार,सज्जनगड,ठोसेघर

१८-१९ सप्टेम्बर २०१०

नुकताच गणपतीचा सीझन संपला होता.त्यामुळे विश्रांतीची गरज होती.म्हणून कास ल़ा जायच मनात असूनसुद्धा टाळत होतो.शुक्रवारी नोटीस बोर्डवर नाव पाहिली.त्यात एक नाव होत "मैत्रेयी".लगेच निर्णय घेतला "जायच".मालकाना तस सांगीतल आणि तयारीला सुरुवात केली.२ दिवसांची ट्रिप.त्याला आवश्यक कपडे आणि इतर सामान गोळा कल.आल्याच्या वड्या,आवळे घेतले.सेल चार्ज करायचे होते.पूर्ण दिवस तयारीत गेला.मला ट्रेक च्या आदल्या दिवशी झोप लगत नाही.सर्व रात्र न पाहिलेल्या कास पठाराच स्वप्न बघत काढली.

Monday, July 19, 2010

कातळधार चा धबधबा

१८ जुलै २०१०
२/३ दिवस पावसाचं नाव नाही.धबधबा कोरडा असला तर?उगाच भीती.पण ठरवलं जायचं.१३ जण जमले.९ ज Qualis मधून.२ जण इंद्रायणी ने आणि १ बाइक वरून आणि अभिजित.८ वाजता लोनावला इथे एकत्र जमलो.आणि पुढे निघालो.
कुणे गावाशी आलो.गाड़ी पार्क केली.तिथेच इडलिचा नाश्ता केला आणि पुढे निघालो.राजमाची ल़ा जो रास्ता जातो तय रस्त्यावर एके ठिकाणी एक रस्ता खाली उल्हास vally त उतरतो.या पॉइंट पासून पूर्ण उतारच उतार.फ़क्त उतरत जायचे.वाटेत फ़क्त जंगल आणि जंगल.हे जंगल फसवं आहे.अनेक ठिकाणी रस्ता भरकटू शकतो.वाटेत ठिकठिकाणी मार्गदर्शक दगड ठेवले आहेत.त्यांच्या आधारे २ तासात आपण कातळधार ला पोहोचतो.धबधबा बारीक च होता.त्यामुळे अगदी खालपर्यन्त जाता आले.सगळ्यानी मनसोक्त पोहुन घेतले.तिथेच एका कड्यात निसर्गनिर्मित घळ आहेत.तिथे sandwitch चा आस्वाद घेतला आणि परतीला निघालो.

Tuesday, June 22, 2010

आजोबा ट्रेक

सह्यपर्वताच्या माथ्यावर-कुशीत आणि पायथ्याशी अनेक स्थळं अशी आहेत की,त्यांच्याशी धार्मिक कथा गुम्फलेल्या आहेत आणि आदिवासी मानवाने त्या गाभारयातल्या देवतांप्रमाणे श्रद्धेने जपलेल्या आहेत.आजोबा पर्वताचा परिसर असाच आहे.रामयणातील उत्तरकांडाचा विषय याच्याशी निगडित आहे.आजोबा म्हणजे रामराजाचा आजोबा-वाल्मीकि ऋषी.यांचा आश्रम येथे होता आणि सीता लव-कुशाना घेउन येथे राहिली होती,अशी कथा सांगतात.नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर शहापुर तालुक्यातील वाल्मीकि आश्रम पोटाशी असलेला आजोबा पर्वत डोंगरमार्गासाठी उत्कृष्ट आहेच,पण सोप्या चढाईमुळे सामान्य पर्यटकांनाही आवाक्यात आहे.आजोबा पर्वताची उंची १३७५ मीटर आहे.वल्मिकिचे देउळ मराठ्मोळं कौलारू,आसपासच्या निसर्गाशी तादात्म्य पावणारं असच आहे.देवळात वाल्मीकि समाधिचा चौथरा आहे.बाहेर यज्ञवेदी आहे.सीतेच्या दुसरया वनवासात ती येथे राहिली.कातळकड्यात सीतेचा पाळणा
अशी जागा आहे।
दिनांक २७.६.२०१०
आदल्या रात्रि "स्मिता पाटिल नावाचा प्रवास" कार्यक्रम बघून आलो होतो.रात्रीच स्पेन आणि चिली ची मैच बघितली.दुसरया दिवशी आजोबा वर स्वारी.पण झोप लागायच नाव नाही.६ वाजता शांतिप्रियाला आणायला गेलो.शांतिप्रिया आली डुलत डुलत कुत्रे वाचवत वाचवत.आल्यावर म्हणते कशी "अय्या!wind cheater राहिल." म्हटल "जा.घेउन ये लवकर" तिला सोडल स्टेशनवर.तोच आला भानुप्रियाचा मेसेज "waiting for train.no train running" असा मेसेज करतात की वाटत ट्रेन चा स्ट्राइक आहे की काय.मग लगेच दूसरा मेसेज."got the train at 5.50..... reaching in 20 min" हा हा हा!!! It makes me crazy and amuses me as well.घरी आलो.माझ्या बैग घेतल्या आणि खाली आलो.म्हटल काहीतरी विसरतोय.camera.....परत वर गेलो.camera घेउन निघालो.स्टेशन वर भानु,superman आणि शांति उभ्या.मी पण जाउन तिथे उभा राहिलो.qualis ची वाट बघत.१५ मिनिटानी जितुचा फोन "गाडी पंक्चर.आणि टायर चे नट उघडता येत नाहीयेत।" बोम्बला......मग superman ला म्हटल "काका तुम्ही निघालात तरी चालेल " ते गेले निघून.मी,भानु,शांति आडोशाला उभे राहिलो.या दोघी घुसल्या बाजूला उभ्या असलेल्या एका ड्रायव्हर विरहित रिक्षात.काही वेळाने धृति आली.more पासून चालत चालत.मग आम्ही ठरवल की more लाच जाउया.मग विचारल रिक्शा वाल्याना.कोण म्हणाल २० कोण ६ रु सीट.मग चढलो बस मधे.आणि टिकिट झाल २० रुपयेच.हा हा हा!!!!!असो.मग पोहोचलो एकदाचे.तिकडे सीन मजेशीर होता.अभिजित गाडीखाली.घोल्या नट उघडायच्या spanner वर उभा.बाकी सगळे footpath वर पडीक.जीतू गायब.किस्सा असा होता की हे सगळे गेला अर्धा तास जो प्रयत्न करत होते तो नट उघडायचा नसून जास्तच tight करायचा होता.गम्मत आहे की नाही.असो.अथक प्रयत्नानंतर एकदाचे बसलो गाडी मधे.भानु शांति तेवढ्यात pattis घेउन आल्या.किती गोड मुली ह्या.असो.१२ जणांचा आमचा ग्रुप.१० जण क्वालिस मधून आणि दोघे बाइकवरून.डोळखांबपर्यंत आम्ही क्वालिस ने पोहोचलो.तिथून पुढे साकुर्लिपर्यंत गेलो.डोळ्खांबला आम्ही न थांबल्यामुळे मागुन येणारया बाइक वाल्याना वाटले आम्ही रस्ता चुकलो आणि ते परत मागे फिरले.आम्ही साकुर्ली जंक्शन ल़ा वाट बघत थांबलो.शेवटी एकदाचा फ़ोन लागला जितुला आणि सगळे परत एकत्र झालो.पायथ्याच्या गावात नाश्ता केला आणि आजोबा कड़े कूच केलं.पावसाचं नाव नव्हतं.काही मिनिटात प्रचंड हीट जाणवायला लागली.विचित्र गरम होत होतं.उन भाजून काढतय असं वाटत होतं.सगळ्यांचा पोंगा झाला होता.१ १/२ तासांच्या चढाईनन्तर एके ठिकाणी सीतामाई च्या पाळण्याचा कड़ा आणि आजोबा दिसायला लागला.जाताना मधे मोठे पठार लागले.पठारावर काही फोटो काढू पुढे सरकलो.साधारण १/२ तासाने वाल्मीकि आश्रमात पोहोचलो.परिसर अत्यंत रम्य.वडाचं झाड़.त्याच्या शेजारची कौलारू धर्मशाला.वाल्मीकि आश्रम.सगळंच सुन्दर.थोडावेळ थाम्बुन पारंब्यांवर झोक्याचा आनंद घेतला.मग निघालो सीतेच्या पाळण्याकडे.अजुन पावसाचं नाव नव्हतं.तिथे जायचा रस्ता एक घळीतून आणि जंगलातून.तासभराच्या खडया चढ़ाईत दमछाक झाली.मग मात्र जे दृश्य बघितले त्याने डोळ्यांचे पारणे फिटले.अजस्त्र ड़ोंगरांची रांग.मधून दिसणारे सुळके.एका धबधब्याची छोटीशी सफ़ेद धार.आणि सावल्यांचा खेळ.अप्रतिम दृश्य डोळ्यात टिपून घेतलं.कारण camera मधे काहीतरी लोचा झाला.सीतामाई च्या पाळण्याचा कड़ा आणि आजोबा यांच्या मधल्या "V" मधे पोहोचलो.आणि लागला तो १० १५ फुटांचा rockpatch.एव्हाना पाउस धो धो कोसळायला सुरुवात झाली होती.rock patch चढायला काही आधारच नव्हता.गंजलेली मोडकी शिडी.सगळ बुळबुळीत झालं होतं.आणि पलिकडे पूर्ण exposure.नाद सोडून दिला आणि परतीला लागलो.१ तासाच्या जोरदार पावसामुळे धबधबा तयार झाला होता.त्यात मनसोक्त भिजलो.उतरताना समोरच्या डोंगररांगेतल्या छोट्या धबधब्यांचे मोठ्यात रूपांतर झाले होते.४ वाजले परत आश्रमात यायला.प्रचंड भूक लागली होती.बकाबक खाल्ल आणि परतीच्या मार्गाला लागलो.

Wednesday, June 2, 2010

माझी कोकण वारी


स्थळ: मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक १७ ,वेळ : सकाळी ७............रस्ता आता चाकाखालचा झाला आहे.अजुन बरच जायच आहे.चहा घ्यायलाच हवा.तरतरी येईल.पनवेल-पेण-नागोठाणे-माणगाव-महाड-चिपळूण आणि मग गुहागर.रस्ता,ट्रक,एसटी साथ देत राहतात.

Thursday, April 15, 2010

पारसिक चा किल्ला

मुम्ब्रा जवळचा पारसिकचा डोंगर बरेच दिवस चढायचं मनात होतं.पण योग यावा लागतो म्हणतात ना तसा तो जुळून आला.एप्रिल महिन्यात छोटा ट्रेक करायचं ठरलं.पहाटे निघून दुपारी घरी परत येता येइल असा.त्या दृष्टीने पारसिक उत्तम ट्रेक आहे.पहाटे ५.३० ल़ा निघून सगळी टीम मुम्ब्र्याला एकत्र जमली आणि ट्रेक चा श्रीगणेशा केला.सर्वप्रथम मुम्ब्रादेविचे दर्शन घेतले.मुम्ब्रा शहराचं दर्शन पहाटे प्रथमच घेत होतो.एका बाजूला धुक्यात हरवलेली उल्हास नदीची खाड़ी,दूर दिसणारे दिवा शहर,खाली वाहता रस्ता मुम्ब्रा बायपास आणि वरून बघता जमीन दिसणार नाही असे दाटीवटीचे मुम्ब्रा शहर....सगळे रम्य.सूर्योदय होता होता चढाईला सुरुवात केली.मुम्ब्रा कडून पारसिक चा डोंग चढायचा मार्ग आहे एका घळीतून .मुम्ब्रादेवी देवळाच्या पायऱया उतरून थोड़े ख़ाली उतरले की उजव्या हाताच्या दुसरया घळीतून वर जाण्याचा मार्ग आहे.हा मार्ग हड्सरच्या नळीच्या वाटेची आठवण करून देतो.दोन डोंगरांच्या मधे अडकलेल्या दगडांच्या कधी खालून कधी वरुन कधी लोकांच्या पायाचा खान्द्यांचा शिडिसरखा वापर करत वर पोहोचलो.वर पोहोचल्यावर उजव्या बाजुच्या डोंगरावर चढ़ाई केली.मुम्ब्रादेवी देवळाच्या बाजूला एक कातळभिंत आहे.गिर्यारोहक ही भिंत चढून ज्या ठिकाणी पोहोचतात तिथे एक झेंडा त्यानी विजयाचं प्रतिक म्हणू लावला आहे.त्या ठिकाणी पोहोचलो.या ठिकाणची ऊंची २०० मीटर म्हणजे ६०० फूट आहे.६०० फुटावरुन दिसणारे मुम्ब्रा शहर अणि परिसर अवर्णनीय.तिथे थोडावेळ थाम्बुन खाली उतरून पारसिक पिनॅकल च्या दिशेने कूच केले.थोडं जंगल थोड़ी मोकळी जगा अशा वाटेने हसत खिदळत रस्ता कधी संपला ते कळलच नाही आणि आम्ही एका महादेवाच्या देवळापाशी आलो.देवळाला भिंती नाहीत.नुकतेच कोणीतरी पूजा करून फुल वाहून गेलं होतं.तिथे थोडा वेळ थाम्बुन खालच्या अंगाला असलेल्या दुसरया एका घरापाशी आलो.इथे कोणीतरी रहात असावं.या घराच्या खालच्या बाजूला एक विहीर आहे.विहिरीतून पाणी काढायला दोरी आणि बादली आणली होती पण विहीर बरीच खोल असल्यामुळे दोरीला ओढ़णी बांधली आणि काम झालं.थंडगार पाणी तोंडावर मारून ताजेतवाने झालो आणि बरोबर आणलेल्या टोस्ट सँडविच आणि ताकावर ताव मारला.आता थोड़ी विश्रांति हवी होतीच त्यामुळे एका झाडाच्या सावलीत निद्राधीन झालो.थोड़े ताजेतवाने झाल्यावर उतरण्यासाठी कूच केले.पारसिक च्या पठारावरून कळव्यात उतरायला सोपा रस्ता आहे.पुढच्या वेळी त्या रस्त्याने उतरायचं नक्की केलं.थोड्या अंतरावर एक मारुतीची मूर्ति असलेली घुमटी लागली.त्याच्या पलिकडील बाजुस पारसिक बोगद्याच्या कलवा बाजूचे कलवा आणि ठाणे शहराचे दृश्य डोळ्यात साठवत पुढे झालो.पारसिक पिनॅकल च्या सोंडेवरुन मुम्ब्रा बायपास रोडवर उतरता येते.हा रस्ता थ्रिलिंग आहे.तो सावधानतेने पार करत एका कबरिपशी रोडवर उतरलो.

Monday, January 18, 2010

हडसर

नाणेघाटातून होणाऱया व्यापारावर नियंत्रण ठेवणारी दुर्गचौकड़ी म्हणजे जीवधन,शिवनेरी,चावंड आणि हडसर.जीवधन,शिवनेरी,चावंड बघून झाले होते.हडसर बाकी होता.मागे निमगिरील़ा गेलो होतो तेव्हा हडसर करायचा बेत होता.पण तो काही कारणामुळे फसला।

हडसर चढ़ायचे दोन रस्ते.एक मुख्य दरवाजातून जाणारा पायरयांचा आणि दूसरा खुंटीची वाट.ती वाट thrilling आहे असे ऐकून होतो.तेव्हा त्या वाटेने वर चढ़ायचे व पायऱयांच्या वाटेने उतरायचे ठरले.पहाटे ६ वाजता निघालो आणि माळशेज घाटातल्या आमच्या नेहमीच्या नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचलो.पण रस्त्याचे काम चालू असल्यामुळे बोगद्याच्या पलीकडल्या जागेत रस्त्यावरच नाश्ता केला.९.३० च्या सुमारास हडसर गावात पोहोचलो.खुंटीच्या वाटेपर्यंत १/२ तासात पोहोचलो.कड्याच्या खली पोहोचल्यावर कड्यात साधारण ५० फुटावर एक घळ दिसत होती.पण कड्यात पायऱया नव्हत्याच.नुसत्याच खोबणी होत्या.हा माझा पहिला ट्रेक ज्यामधे वर चढायला पायऱया नव्हत्या.राजगडाचा बालेकिल्ला,जीवधन याना जश्या पायरया आहेत तश्या इथे नाहीत.उभाच्या उभा कड़ा आहे त्यात हात अडकवायला खोबणी आहेत.विशेष गोष्ट अशी की या पूर्ण ५० फुटाच्या कातळात विशिष्ट अंतरावर दगडात लोखंडाच्या खुंट्या ठोकल्या आहेत.त्या सीमेंट ने पक्क्या केल्या आहेत.त्या धरायच्या व त्यांच्या आधाराने शरीर खेचत वर जायचे.जितुने सांगितले होते की गोगटे मावशी या वाटेने गेल्या होत्या त्यामुळे आम्हाला चढ्णे भागच होते.पहिल्यांदा पूर्ण exposure मधे चढत होतो.जीतू आधी पूर्ण वर जाउन परत ख़ाली आला.त्यामुळे साधारण अंदाज आला.मग बाकिच्याना कसे चढ़वायचे त्याचे planning करून मी सगळ्यात आधी २ मिनिटात वर पोहोचलो.म वर आले "माझे बाबा".त्यांचे वय ६२.त्यामुळे काळजी होती.पण जीतू अणि अभिजित च्या प्रयत्नानी ते वर पोचले.नंतर धृति,दीपिका,प्रचिती आणि मग सगळे टोणगे वर चढले.रोहित ने सगळ्या बुटांच्या लेस एकमेकात अड्कवल्या आणि रोप च्या सहाय्याने ते व घेतले.एक टप्पा पार केला.तशी जीतू म्हणाला वर अजु एक "छोटासा" patch आहे.होता छोटासाच पण तो ही exposure वाला.त्यालाही खुंट़या ठोकल्या होत्या.तो ही टप्पा पर केला अणि एकदाचे वर पोहोचलो.तिथे एक ग्रुप फोटो घेतला.बुरुजा वरच्या झेन्ड्याजावळ काही जणानी फोटो सेशन केले आणि पुढे निघालो.वाटेत हनुमानाची मूर्ति,पाण्याचे टाके,पडके देउळ,दगडी परात असे बघत बघत शंकराच्या देवळापाशी पोहोचलो.देउळ काळ्या दगडात बांधलेले,टुमदार अणि अतिशय सुन्दर आहे.आतमधे शंकराची पिंडी,गणेश व गरुडाच्या मूर्ति आहेत.बाहेर नंदी आहे.

चारही बाजूला माणिकडोह जलाशय,शहाजिसागर धरण,सिन्दोळा किल्ला,शिवनेरी,चावंड किल्ला,नाणेघाट,लेण्याद्रि चा डोंगर,जीवधन असे रमणीय दृश्य दिसते.सळे बघितल्या वर भरपेट जेवण केले आणि सगळे आपापले छोटे छोटे ग्रुप करून झोपेच्या स्वाधीन झाले.आराम करून झाल्यावर गडाची भटकंती चालू केलि.थोड्या अंतरावर जमिनीच्या ख़ाली एक रस्ता गेला होता त्याने आत शिरलो.आत मध्ये तीन खोल्या होत्या.प्रत्येक खोली मधे आत मधे कोरलेल्या कोठया होत्या.सगळे एक दगडात कोरलेले.आणि कोरीव काम सुद्धा सुन्दर.तेथून वर आलो आणि मुख्य दरवाज्यापाशी पोहोचलो.सगळ्या पायऱया एकाच दगडात कोरलेल्या.त्यामुले आश्चर्याचा धक्का बसतो.दरवाज्याच्या चौकटी तर अप्रतिम.ख़ाली उतरायचा रस्ता लांबचा असल्यामुळे short कट वापरायचे ठरले.रस्ता एका घळीतून ख़ाली उतरणारा होता.हळुह्ळु सगळे ख़ाली उतरलो.साधारण ६.३० वाजले होते.गाडीत बसल्यावर प्रचंड भूक लागली होती.वेफर्स,चिवड़ा,पेढे,संत्र यांच्या वर ताव मारला.डोंबिवलीला पोहोचायला १० वाजले.आणि एका थ्रिल्लिंग ट्रेक ची सांगता झाली.

watch the video : http://vimeo.com/8882040