पावसातल्या सातपुलाची
गरमागरम भज्यांची
चिकन आणि सुरमईची
आठवण येते।
लांब हाताच्या शर्टची
हडसरच्या रेकीची
कानातल्या लांब ear ring ची
आठवण येते।
गणपतीतल्या राणीची
वाढदिवसाच्या केकची
बुंदीच्या कळ्यांची
आठवण येते।
लाल रंगाच्या चपलांची
घारया भेदक डोळ्यांची
तुझ्या "अय्या हो का" ची
आठवण येते।
तू रंगवलेल्या गणपतीची
तुझ्या कलरफ़ुल छत्रीची
उसळ आणि पोळीची
आठवण येते।
spanish च्या levels ची
नाकातल्या रिंगची
ठसठशीत ओठांची
आठवण येते।
पहाटे ५.३० ची
गावाहून केलेल्या फोनची
आ वासलेल्या बुटाची
आठवण येते।
तुझ्या विचित्र वागण्याची
तुझ्या मिश्किल हसण्याची
तुझ्या देवभोळेपणाची
आठवण येते।
अशाच आठवणी काढताना
काहीतरी केव्हातरी कुठेतरी
***
तुझी आठवण येते।
No comments:
Post a Comment