उंची-६१० मी(२००२ फ़ूट)
जवळचे गाव-खांडस
भीमाशंकर ल़ा
कोकणातुन दोन वाटा आहेत.एक आहे गणेश घाट आणि दूसरी शिडी घाट.त्यापैकी गणेश घाटाने जायच्या रस्त्यावर पदरगडाकडे जायची वाट आहे.जीतू आणि वैभव आधीच pilot trek करून आलेले असल्यामुळे रस्ता माहित झाला होता.खांडस ल़ा पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारात गाड्या park केल्या.रोहित मिलिंद अगोदरच येउन पोहोचले होते.आमचा पहिला पड़ाव होता गणेश मंदिर जे २ किमी वर होते.सकाळच्या वेळी खांडस गावातून जायचा आनंद काही वेगळाच होता.साधारण १ १.१५ तासाच्या चालीनंतर आम्ही गणपती मंदिरात पोहोचलो।गणपती मंदिर छोटेसे आणि कौलारू आहे.मंदिराच्या आवारात बसून इड
ली चा नाश्ता केला.आणि पुढे पदरगडाच्या वाटेला लागलो।साधारण ४५ मिनिटांच्या नंतरच्या प्रवासात एक माळरान लागले आणि आम्ही दुसऱ्या पडावाशी पोहोचलो.तो पड़ाव आहे एक विहीर.भीमाशंकर किंवा पदरगडाच्या trek मध्ये ही विहिरच पाण्याचा source आहे.पोटं आणि बाटल्या पाण्याने भरून घेतल्या.येथून पदरगडाकडे जायचा मार्ग वर जंगलात चढतो.हा टप्पा घसारायुक्त,छोट्या कातळ टप्प्यांचा आणि रोमांच
क आहे.साधारण १ तासाच्या चढणीनंतर आम्ही चिमणीत पोहोचलो.हे पदर गडाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.२ माणसे जेमतेम उभी राहू शकतील इतकीच ती जागा आहे.दोन्ही हात आणि पाय यां
चा वापर करून वर चढलो.आणि तेथून पदर चा rock patch येतो.patch आहे छोटासाच पण मजा येते चढताना.patch संपला की थोडासा घसारायुक्त मार्ग लागतो आणि आपण पदरगडावर पोहोचतो.वर पोहोचल्यावर एक छोटीशी गुहा लागते.त्या गुहेत विसावा घेतला आणि जेवण सुद्धा.या
गुहेशेजारून वर चढायला पायरया आहेत.त्या चढून गेल्यावर आपण पदर गडाच्या पहिल्या भिंति
शी पोहोचतो.या भिंतीच्या डावीकडून पलिकडे गेल्यावर आपण दुसऱ्या भिंतिशी पोहोचतो.या भिंतीच्या पायथ्याशी कडेकडेने exposed route ने आपण मोठ्या गुहेत पोहोचतो.या गुहेतून शिडी वाट,भीमाशंकर चे नागफणी टोक असे विहंगम दृश्य दिसते.
No comments:
Post a Comment