नाणेघाटातून होणाऱया व्यापारावर नियंत्रण ठेवणारी दुर्गचौकड़ी म्हणजे जीवधन,शिवनेरी,चावंड आणि हडसर.जीवधन,शिवनेरी,चावंड बघून झाले होते.हडसर बाकी होता.मागे निमगिरील़ा गेलो होतो तेव्हा हडसर करायचा बेत होता.पण तो काही कारणामुळे फसला।
हडसर चढ़ायचे दोन रस्ते.एक मुख्य दरवाजातून जाणारा पायरयांचा आणि दूसरा खुंटीची वाट.ती वाट thrilling आहे असे ऐकून होतो.तेव्हा
त्या वाटेने वर चढ़ायचे व पायऱयांच्या वाटेने उतरायचे ठरले.पहाटे ६ वाजता निघालो आणि माळशेज घाटातल्या आमच्या नेहमीच्या नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचलो.पण रस्त्याचे काम चालू असल्यामुळे बोगद्याच्या पलीकडल्या जागेत रस्त्यावरच नाश्ता केला.९.३० च्या सुमारास हडसर गावात पोहोचलो.खुंटीच्या वाटेपर्यंत १/२ तासात पोहोचलो.कड्याच्या खली पोहोचल्यावर कड्यात साधारण ५० फुटावर एक घळ दिसत होती.पण कड्यात पायऱया नव्हत्याच.नुसत्याच खोबणी होत्या.हा माझा पहिला ट्रेक ज्यामधे वर चढायला पायऱया नव्हत्या.राजगडाचा बालेकिल्ला,जीवधन याना जश्या पायरया आहेत तश्या इथे नाहीत.उभाच्या उभा कड़ा आहे त्यात हात अडकवायला खोबणी आहेत.विशेष गोष्ट अशी की या पूर्ण ५० फुटाच्या कातळात विशिष्ट अंतरावर दग
डात लोखंडाच्या खुंट्या ठोकल्या आहेत.त्या सीमेंट ने पक्क्या केल्या आहेत.त्या धरायच्या व त्यांच्या आधाराने शरीर खेचत वर जायचे.जितुने सांगितले होते की गोगटे मावशी या वाटेने गेल्या होत्या त्यामुळे आम्हाला चढ्णे भागच होते.पहिल्यांदा पूर्ण exposure मधे चढत होतो.जीतू आधी पूर्ण वर जाउन परत ख़ाली आला.त्यामुळे साधारण अंदाज आला.मग बाकिच्याना कसे चढ़वायचे त्याचे planning करून मी सगळ्यात आधी २ मिनिटात वर पोहोचलो.मग वर आले "माझे बाबा".त्यांचे वय ६२.त्यामुळे काळजी होती.पण जीतू अणि अभिजित च्या प्रयत्नानी ते वर पोचले.नंतर धृति,दीपिका,प्रचिती आणि मग सगळे टोणगे वर चढले.रोहित ने सगळ्या बुटांच्या लेस एकमेकात अड्कवल्या आणि रोप च्या सहाय्याने ते वर घेतले.एक टप्पा पार केला.तशी जीतू म्हणाला वर अजु
न एक "छोटासा" patch आहे.होता छोटासाच पण तो ही exposure वाला.त्यालाही खुंट़या ठोकल्या होत्या.तो ही टप्पा पर केला अणि एकदाचे वर पोहोच
लो.तिथे एक ग्रुप फोटो घेतला.बुरुजा वरच्या झेन्ड्याजावळ काही जणानी फोटो सेशन केले आणि पुढे निघालो.वाटेत हनुमानाची मूर्ति,पाण्याचे टाके,पडके देउळ,दगडी परात असे बघत बघत शंकराच्या देवळापाशी पोहोचलो.देउळ काळ्या दगडात बांधलेले,टुमदार अणि अतिशय सुन्दर आहे.आतमधे शंकराची पिंडी,गणेश व गरुडाच्या मूर्ति आहेत.बाहेर नंदी आहे.

चारही बाजूला माणिकडोह जलाशय,शहाजिसागर धरण,सिन्दोळा किल्ला,शिवनेरी,चावंड किल्ला,नाणेघाट,लेण्याद्रि चा डोंगर,जीवधन असे रमणीय दृश्य दिसते.सग
ळे बघितल्या वर भरपेट जेवण केले आणि सगळे आपापले छोटे छोटे ग्रुप करून झोपेच्या स्वाधीन झाले.आराम करून झाल्यावर गडाची भटकंती चालू केलि.थोड्या अंतरावर जमिनीच्या ख़ाली एक रस्ता गेला होता त्याने आत शिरलो.आत मध्ये तीन खोल्या होत्या.प्रत्येक खोली मधे आत मधे कोरलेल्या कोठया होत्या.सगळे एक दगडात कोरलेले.आणि कोरीव काम सुद्धा सुन्दर.तेथून वर
आलो आणि मुख्य दरवाज्यापाशी पोहोचलो.सगळ्या पायऱया एकाच दगडात कोरलेल्या.त्यामुले आश्चर्याचा धक्का बसतो.दरवाज्याच्या चौकटी तर अप्रतिम.ख़ाली उतरायचा रस्ता लांबचा असल्या
मुळे short कट वापरायचे ठरले.रस्ता एका घळीतून ख़ाली उतरणारा होता.हळुह्ळु सगळे ख़ाली उतरलो.साधारण ६.३० वाजले होते.गाडीत बसल्यावर प्रचंड भूक लागली होती.वेफर्स,चिवड़ा,पेढे,संत्र यांच्या वर ताव मारला.डोंबिवलीला पोहोचायला १० वाजले.आणि एका थ्रिल्लिंग ट्रेक ची सांगता झाली.
watch the video : http://vimeo.com/8882040
हडसर चढ़ायचे दोन रस्ते.एक मुख्य दरवाजातून जाणारा पायरयांचा आणि दूसरा खुंटीची वाट.ती वाट thrilling आहे असे ऐकून होतो.तेव्हा
चारही बाजूला माणिकडोह जलाशय,शहाजिसागर धरण,सिन्दोळा किल्ला,शिवनेरी,चावंड किल्ला,नाणेघाट,लेण्याद्रि चा डोंगर,जीवधन असे रमणीय दृश्य दिसते.सग
watch the video : http://vimeo.com/8882040
No comments:
Post a Comment