Saturday, January 2, 2010

मंगळगड उर्फ़ कांगोरी



मंगळगड उर्फ़ कांगोरी

डोंबिवली हुन १ सीटर मिनी बसने रात्री १२ वाजता निघालो.पहाटे ४.३० - ५ च्या सुमारास महाड ल़ा पोहोचलो.धु्कयामुळे गान्धारपाले शोधायला वेळ लागला पण रोहित च्या GPRS ने काम केले.शेवटी मिलाली लेणी एकदाची.सगळे ५-१० मिनिटात वर पोहोचलो आणि लगेच पथारी पसरल्या.६-६.३० ल़ा समोरच्या क्षितिजावर होणारा सूर्यास्त फार छान दिसत होता.जितुने चहा केला.तो घेउन सर्व लेणी बघून पुढे निघालो.१० वाजता पिंपळेवाडी या गडाच्या पायथ्याच्या गावी पोहोचलो.रस्त्यात बसूनच इडलीचा नाश्ता केला.गावातला एक "नाना पाटेकर" गाइड म्हणून यायला तयार झाला.आम्ही चढायला सुरुवात केली.नाना पाटेकर ने गोगटे मॅडम ची सॅक घेतली.तिथेच शंकेची पाल चुकचुकली.थोड़े अंतर चढल्यावर पैशांवारून नाना घासाघीस करायला लागला.त्याला 'वट लो' केले आणि आम्ही परत चढायला लागलो.सगली चढण उभी.सुरुवातीपासून शेवटपर्यंत.कुठे लू सॉइल कुठे पिवळे गवत.या गडावर चढताना सरळ सरळ वर चढत जायचे.एका ठिकाणी सावलीत विसाव्यासाठी थांबलो.संत्री,कॉर्न,लिम्बू सरबत,गोळ्या यांचा आस्वाद घेतला आणि परत चढायला लागलो.गडाचा आडवा कड़ा लागल्यावर कड्याखालून traverse चालायला सुरुवात केली.जंगलातून वाट काढत दरवाज्यापाशी पोहोचलो.दरवाजा शिल्लक नाही.वर आलो अणि समोर दिसले ते कांगोरी देवी चे छान से देऊळ आणि कांगोरी माची.चहुकडे सह्याद्रीच्या रांगा.मागे दिसतो तो कांगोरी चा बालेकिल्ला.कांगोरी देवी मंदिराकडे जाताना उजव्या हाताला खाली पाण्याची टाकी लागली.५ मिनिटात मंदिरात पोहोचलो.छोटेसे पण आकर्षक असे हे देऊ आहे.त्या देवळात जेवण केले.जितूने एकीकडे मस्त सूप बनवले.जेवायला sandwich होते.जेवण झाल्यावर देवळाच्या मागे माचीच्या टोकापर्यंत जाउन आलो.परत येउन देवालत थोड़ी विश्रांति घेउन मग बालेकिल्ला सर केला.तिथे पण पाण्याचे बऱ्यापैकी मोठे असे टाके आहे.एक पडकी ईमारत आहे आणि बाकी झाड़ी आणि गवत.६ वाजता परत यायला निघालो.१० वाजता डोंबिवलीला पोहोचलो.

No comments:

Post a Comment