सह्यपर्वताच्या माथ्यावर-कुशीत आणि पायथ्याशी अनेक स्थळं अशी आहेत की,त्यांच्याशी धार्मिक कथा गुम्फलेल्या आहेत आणि आदिवासी मानवाने त्या गाभारयातल्या देवतांप्रमाणे श्रद्धेने जपलेल्या आहेत.आजोबा पर्वताचा परिसर असाच आहे.रामयणातील उत्तरकांडाचा विषय याच्याशी निगडित आहे.आ
जोबा म्हणजे रामराजाचा आजोबा-वाल्मीकि ऋषी.यांचा आश्रम येथे होता आणि सीता लव-कुशाना घेउन येथे राहिली होती,अशी कथा सांगतात.नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर शहापुर तालुक्यातील वाल्मीकि आ
श्रम पोटाशी असलेला आजोबा पर्वत डोंगरमार्गासाठी उत्कृष्ट आहेच,पण सोप्या चढाईमुळे सामान्य पर्यटकांनाही आवाक्यात आहे.आजोबा पर्वताची उंची १३७५ मीटर आहे.वल्मिकिचे देउळ मराठ्मोळं कौलारू,आसपासच्या निसर्गाशी तादात्म्य पावणारं असच आहे.देवळात वाल्मीकि समाधिचा चौथरा आहे.बाहेर यज्ञवेदी आहे.सीतेच्या दुसरया वनवासात ती येथे राहिली.कातळकड्यात सीतेचा पाळणा
अशी जागा आहे।
दिनांक २७.६.२०१०
आदल्या रात्रि "स्मिता पाटिल नावाचा प्रवास" कार्यक्रम बघून आलो होतो.रात्रीच स्पेन आणि चिली ची मैच बघितली.दुसरया दिवशी आजोबा वर स्वारी.पण झोप लागायच नाव नाही.६ वाजता शांतिप्रियाला आणायला गेलो.शांतिप्रिया आली डुलत डुलत कुत्रे वाच
वत वाचवत.आल्यावर म्हणते कशी "अय्या!wind cheater राहिल." म्हटल "जा.घेउन ये लवकर" तिला सोडल स्टेशनवर.तोच आला भानुप्रियाचा मेसेज "waiting for train.no train running" असा मेसेज करतात की वाटत ट्रेन चा स्ट्राइक आहे की काय.मग लगेच दूसरा मेसेज."got the train at 5.50..... reaching in 20 min" हा हा हा!!! It makes me crazy and amuses me as well.घरी आलो.माझ्या बैग घेतल्या आणि खाली आलो.म्हटल काहीतरी विसरतोय.camera.....परत वर गेलो.camera घेउन निघालो.स्टेशन वर भानु,superman आणि शांति उभ्या.मी पण जाउन तिथे उभा राहिलो.qualis ची वाट बघत.१५ मिनिटानी जितुचा फोन "
गाडी पंक्चर.आणि टायर चे नट उघडता येत नाहीये
त।" बोम्बला......मग superman ला म्हटल "काका तुम्ही नि
घालात तरी चालेल " ते गेले निघून.मी,भानु,शांति आडोशाला उभे राहिलो.या दोघी घुस
ल्या बाजूला उभ्या असलेल्या एका ड्रायव्हर विरहित रिक्षात.काही वेळाने धृति आली.more पासून चालत चालत.मग आम्ही ठरवल की more लाच जाउया.मग विचारल रिक्शा वाल्याना.कोण म्हणाल २० कोण ६ रु सीट.मग चढलो बस मधे.आणि टिकिट झाल २० रुपयेच.हा हा हा!!!!!असो.मग पोहोचलो एकदाचे.तिकडे सीन मजेशीर होता.अभिजित गाडीखाली.घोल्या नट उघडायच्या spanner वर उभा.बाकी सगळे footpath वर पडीक.जीतू गायब.किस्सा असा होता की हे सगळे गेला अ
र्धा तास जो प्रयत्न करत होते तो नट उघडायचा नसून जास्तच tight करायचा होता.गम्मत आहे
की नाही.असो.अथक प्रयत्नानंतर एकदाचे बसलो गाडी मधे.भानु शांति तेवढ्यात pattis घेउन आल्या.किती गोड मुली ह्या.असो.१२ जणांचा आमचा ग्रुप.१० जण क्वालिस मधून आणि दोघे बाइकवरून.डोळखांबपर्यंत आम्ही क्वालिस ने पोहोचलो.तिथून पुढे साकुर्लिपर्यंत गेलो.डोळ्खांबला आम्ही न थांबल्यामुळे मागुन येणारया बाइक वाल्याना वाटले

आम्ही रस्ता चुकलो आणि ते परत मागे फिरले.आम्ही साकुर्ली जंक्शन ल़ा वाट बघत थांबलो.शेवटी एकदाचा फ़ोन लागला जितुला आणि सगळे परत एकत्र झालो.पायथ्याच्या गावात नाश्ता केला आणि आजोबा कड़े कूच केलं.पावसाचं नाव नव्हतं.काही मिनिटात प्रचंड हीट जाणवायला लागली.विचित्र गरम होत होतं.उन भाजून काढतय असं वाटत होतं.स

गळ्यांचा पोंगा झाला होता.१ १/२ तासांच्या चढाईनन्तर एके ठिकाणी सीतामाई च्या पाळण्याचा कड़ा आणि आजोबा दिसायला लागला.जाताना मधे मोठे पठार ला
गले.पठारावर काही फोटो काढू
न पुढे सरकलो.साधारण १/२ तासाने वाल्मीकि आश्रमात पोहोचलो.परिसर अत्यंत रम्य.वडाचं झाड़.त्याच्या शेजारची कौलारू धर्मशा
ला.वाल्मीकि आश्रम.सगळंच सुन्दर.थोडावेळ थाम्बुन पारंब्यांवर झोक्याचा आनंद घेतला.मग निघालो सीतेच्या पाळण्याकडे.अजुन पावसाचं नाव

नव्हतं.तिथे जायचा रस्ता एक घळीतून आणि जंगलातून.तासभराच्या खडया चढ़ाईत दमछाक झाली.मग मात्र जे दृश्य बघि
तले त्याने डोळ्यांचे पारणे फिटले.अजस्त्र ड़ोंगरांची रांग.मधून दिसणारे सुळके.एका धबधब्याची छोटीशी सफ़ेद धार.आणि सावल्यांचा खेळ.
अप्रतिम दृश्य डोळ्यात टिपून घेतलं.कारण camera मधे काहीतरी लोचा झाला.
सीतामाई च्या पाळण्याचा कड़ा आणि आजोबा यांच्या मधल्या "V" मधे पोहोचलो.आणि लागला तो १० १५ फुटांचा rockpatch.एव्हाना पाउस धो धो कोसळायला सुरुवात झाली होती.rock patch चढायला काही आधारच नव्हता.गंजलेली मोडकी शिडी.सगळ बुळबुळीत झालं होतं.आणि पलिकडे पूर्ण exposure.नाद सोडून दिला आणि परतीला लागलो.१ तासाच्या जोरदार पावसामुळे धबधबा तयार झाला होता.त्यात मनसोक्त भिजलो.उतरताना समोरच्या डोंगररांगेतल्या छोट्या धबधब्यांचे मोठ्यात रूपांतर झाले होते.४ वाजले परत आश्रमात यायला.प्रचंड भूक लागली होती.बकाबक खाल्ल आणि परतीच्या मार्गाला लागलो.
No comments:
Post a Comment