Friday, May 6, 2011

माहुलीला घडलेला अप्रिय अपघात

व्यक्तींची नावे बदलली आहेत.प्रसंग खरा अहे.

३१ मे १९९७

"सह्यमित्र" संस्थेचा ग्रुप ट्रेक होता माहुलीला.महेश होता लीडर.महेश आणि ग्रुप शिडीच्या वाटेने वर जाणार होते.महेशच्या काही मित्रानी कल्याण दरवाज्याने वर चढायचे ठरवले.महेशने त्याना विनंती केली की ग्रुप ट्रेकला तुम्ही असं करू नका.इतर वेळी ठीक आहे.पण म्हणतात ना गोष्टी घडायच्या असल्या की घडतातच.एकुण ६ जणानी कल्याण दरवाजा रूट घ्यायचे ठरवले.त्यांच्या मधे एक अगदी नवीन ट्रेकर आणि एक मुलगीही होती.रूट आहे तसा अवघड.जंगलातून वाटा सापडत नाहीत आणि मधे येणारे rock patches त्यामुळे सहसा त्या वाटेने कुणी जात नाहीत.पण...........

प्रकाश आधी महेश लाच join करणार होता.पण काही कारणामुळे त्याला जामले नाही आणि त्याने त्या ६ जणाना join व्हायचे ठरवले.प्रकाश तसा अनुभवी ट्रेकर.या आधी त्याने अलंग मदन कुलंग केले होते आणि काही ट्रेक तर अगदी एकट्याने सुद्धा.ट्रेकला अगदी sleepers सुध्दा घालत असे तो.यावेळीही त्याने sleepers घातल्या होत्या बहुदा.भविष्य बघायचा त्याला छंद होता.का कुणास ठाउक पण तो म्हणत असे "मी अल्पायुषी आहे".गम्मत म्हणुन असेही म्हणे की "मरण यावं तर किल्ल्याच्या सान्निद्ध्यात".

एव्हाना महेश किल्ल्यावर पोहोचला होता.किल्ला सगळा बघुन झाला आणि भटोबा pinnacle च्या बाजुच्या पठारावर चहा चा बेत करण्यात आला.कल्याण दरवाजा जवळपासच असल्यामुळॆ सर्व जण त्या ७ जणांची वाट बघत होते.

प्रकाश आणि इतर ६ जण सकाळी निघाले असावेत बहुतेक.वाटा मिळणे अवघडच जात होते.आणि त्यात ३१ मे चा दिवस.उन नुसते रणरणत होते.तहान तहान होत होते.आणलेले थोडेफ़ार पाणी लगेच संपले होते.कधी एकदा वरच्या ग्रुपला भेटतोय असे प्रत्येकाला वाटत होते.आणि त्यात अगदी नवख्या माणसाला त्या रूट ने आणणे म्हणजे ट्रेक लीडरवर दडपण होतेच.लीडर अर्थातच प्रकाश होता.अनुभवी होता ना तो.सर्व अडथळे पार करत ते ७ जण तुटलेल्या पायरया आहेत तिथपर्यंत येउन पोहोचले.इथे एक अवघड असे एक वळण घ्यावे लागते.patch च्या वर एक टेपाड आहे.त्यावर पिवळे गवत माजले होते.प्रकाश एकटाच मागे राहिला होता कशामुळे तरी.बाकीचे ६ जण कसा बसा तो patch पार करुन कल्याण दरवाज्यात पोहोचले सुद्धा.प्रचंड तहान लागली होती त्याना त्यामुळे वर जायचे त्राण उरले नव्हते.त्यातला एक जण वर चढुन आला महेश कडे आणि सगळ्याना पाणी घेउन परत कल्याण दरवाज्यात गेला.एव्हाना प्रकाश patch जवळ पोहोचला होता.वरुन महेश आणि मित्र त्याला बघु शकत होते.प्रकाश टेपाडापर्यंत पोहोचला.आणि त्याने पिवळ्या गवतावर पाय ठेवला आणि............काही कळायच्या आतच तो त्या गवतावरुन घसरला........इथुन खाली ५०० फ़ूट fall आहे...........महेश ने प्रकाशला कड्यातून निसटताना आणि खाली दरीत कोसळताना पहिले आणि प्रकाश दिसेनासा झाला........महेशच्या पोटात धस्स झाले.पण तो काय समजायचे ते समजुन चुकला होता.कल्याण दरवाज्यातल्या कोणालाही याची जरासुद्धा कल्पना नव्हती.

महेशला आता पटापट निर्णय घ्यायचे होते.घटना समजताच ट्रेक तिथेच cancel करण्यात आला.सर्वजण शिडीच्या वाटेने खाली उतरले.त्याना ट्रेन ने घरी पाठवण्यात आले.आता प्रकाश चा शोध घ्यायचा होता.तो वाचण्याची शक्यताच नव्हती.rescue साठी आणि जर काही कमीजास्त झाले असले तर tyachI body शोधण्यासठी ropes आणि ५/६ climbers ची टीम आणण्यासाठी महेश कल्य़ाण ला पोहोचला.सगळ्याना फ़ोन करण्यात आले.फ़क्त प्रकाशच्या घरी काही कळवण्यात आले नाही.दुसरया दिवशी सकाळी सर्वजण माहुलीला पोहोचले.गावकरी मदतीला घेउन बरयाच प्रयत्नांनंतर प्रकाशचा छिन्नविच्छिन्न झालेला देह त्यांच्या हाती लागला.देह फ़ुगला असल्यामुळे बराच जड झाला होता.कसाबसा तो माहुली खालच्या गावात आणण्यात आला.गावकरी तयार होइनात.त्याना दारु पाजण्यात आल्यानंतरच त्यानी तो खाली आणला होता.तिथुन body शहापूर ला हलवण्यात आली.तिथे तिचे nominal post mortem करण्यात आले आणि नंतर dead body प्रकाश च्या घरी भांडुपला नेण्यात आली.अजुनही शोकांतिकेचा अंत झाला नव्हता.जिल्हा बदलला की death चे पेपर्स verify करावे लागतात त्यामुळे स्मशानात ते विचारण्यात आले.मग राजावाडी hospital मधे जाउन सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर तब्बल ७२ तासांनंतर प्रकाशच्या देहाला अग्नी मिळाला.

आदल्या दिवशी महेशने प्रकाशच्या वडिलाना फ़ोन केला."काका एक अपघात घडलाय प्रकाशला.आपल्याला शहापूरला जायचय." वडील म्हणाले "महेश....खरं काय ते सांग.तो गेलाय का?".....महेश ला काय बोलायचं ते सुचत नव्हत....जड अंत:करणाने तो म्हणाला "हॊ"........काय अवस्था झाली असेल त्या वडिलांची?..........

सर्वच जणांसाठी..........नातेवाईक,मित्र,ट्रेकर्स.....सगळ्यांसाठी अतीशय ह्र्दयद्रावक आणि दु:खद अशी ही घटना घडली.

हा एक अपघात होता.पण तरीही...........

माझी सर्व ट्रेकर्स ना कळकळीची विनंती आहे की या घटनेपासुन बोध घेउन काही मूलभूत नियम जर सर्वांनी पाळले तर अशा घटना टाळता येतील.....

wish U all happy and Safe trekking.........

Life is precious......value it and enjoy..........

Monday, May 2, 2011

सांधण चा फ़ट्टांग ट्रेक

माहुली,अशेरी आणि पदरगडाच्या ट्रेक नंतर एप्रिल महिना उकाड्यामुळे आणि ट्रेक मित्रांच्या वैयक्तिक कारणांमुळे ट्रेक शिवायच गेला।:( त्यामुळे re re shedule करत सांधण valley चा ट्रेक एकदाचा १ मे ला ठरला.पंकजचा blog वाचला होता आणि महिनाभर google map,picassa albums आणि जिथे जिथे माहिती मिलेळ तिथुन भरपुर वाचलं होतं.त्यामुळे सांधण valley त जायची प्रचंड उत्सुकता होती.
३० एप्रिलला २७ जणांची jumbo team डोंबिवली हुन रात्री १२ वाजता निघाली.आयत्या वेळी अजय ऐवजी रोशनी आणि महेन्द्र ऐवजी वैभव अशा replacement झाल्या.सुनिल शिंदेला मानगड नंतर ५/६ वर्षांनंतर भेटत होतो.त्यामुळे भरपुर गप्पा मारल्या.त्यामुळे सब बेटे "नाराज" हो गये....:( मित्रा नितेश मला माफ़ कर.अशी चूक मी परत करणार नाही.!!!कसारा घाटात चहा साठी थांबलो आणि मग पहाटे ५ वाजता घाटघर धरणाजवळ आश्रमशाळेत पोहोचलो.पब्लिक झोपी गेलं आणि मी,प्रणय,निरु आणि सुनील थोडावेळ फ़ेरफ़टका मारला आणि निसर्गाचा आस्वाद घेतला.८ वाजायच्या सुमारास इडलीचा नाश्ता करुन २ किमी वर असलेल्या साम्रद गावात पोहोचलॊ.थोडावेळ फ़ोटो सेशन करुन सांधणकडे कूच केले.खुट्टा सुळका,रतनगड,अलंग,मदन,कुलंग सगळॆ धुक्यात लपले होते.साधारण ४५ मिनिटे चालल्यानंतर एका तुटलेल्या कड्याच्या टोकाशी पोहोचलो.इथुन सांधण valley च्या बाजुला असलेल्या मिनी कोकणकड्याचे रौद्रभीषण दर्शन घेता येते.आजोबा डोंगर,करोली घाट,सीतेचा पाळणा,रतनगड,खुट्टा सुळका,बाण सुळका यांचे दर्शन डोळ्यांचे पारणे फ़ेडुन जाते.सगळ्यांनी अगदी झोपुन झोपुन खालच्या valley चे आणि fall चे डोळे गरगरवून टाकणारे दर्शन घेतले.कड्याच्या जवळूनच exposed route वरुन सांधण valley च्या कोकणात उघडणारया तोंडाशी पोहोचलो आणि valley चे वरुन दर्शन घेतले.तिथुन परतुन valley च्या जवळुनच चालत valley च्या तोंडाशी पोहोचलो जिथुन आत प्रवेश करता येतो.

सांधण valley हा निसर्गाचा चमत्कार आहे.कातळामध्ये निसर्गनिर्मित एक प्रचंड भेग तयार झाली आहे. साधारण २०० फ़ूट खोल अशी ही भेग आहे.सुरुवातीला ती १५/२० फ़ूट आहे आणि मग वाढत जाउन ती १०० फ़ुटापर्यंत open होत जाते.पावसात valley च्या दोन्ही भिंतींवरुन पाणी आत पडते आणि त्यामुळे आतमध्ये पाण्याची pockets तयार होतात.हे पाणी बर्फ़ासारखे थंड असते.आम्हाला अशी २/४ pockets लागली.त्यातल्या एका pocket मधून जावेच लागते.या pocket मध्ये मे महिन्यात सुद्धा छातीभर पाणी होते.या pocket ची लांबी साधारण २०/२५ फ़ूट आहे.पाणी म्हटल्यावर दंगा होणारच आणि तसा तो झाला सु्द्धा.दोन्ही कडयातून सुटलेले कातळकडे आतमधे पडतात त्यामुळे सांधणच्या बेस ला छोट्यामोठया आणि काही अशा दगडगोट्यांचे bed तयार झाले आहे.काही शिलाखंड तर अजस्त्रच आहेत.प्रचंड आकाराच्या या शिलाखंडामधुन वाट काढत काढ valley च्या अर्ध्यापर्यंत पोहोचलो.इथुन खाली पुढे जात येते पण अगदी तळाशी गेल्यावर ५० फ़ूट तुटलेला कडा आहे तो रोपनेच उतरता येतो.त्यामुळे तिथेच थांबलो.या ठिकाणी २०/२५ जण बसतील एवढी प्रचंड शिळा आहे त्यावर सर्व जण बसलो आणि त्या valley च्या सौंदर्यात जणुकाही सामवुन गेलो.१५ मिनिटांच्या विश्रांतीनंतर सर्वजण तो १/१.५ किमीचा Bed पार करत बाहेर आलो.valley च्या तोंडाशी पिण्याच्या पाण्याचे छोटेसे pocket आहे तिथे थांबुन पाणी पिउन विसावा घेतला आणि परत निघालो साम्रदकडे.बाहेर पडल्या पडल्या रतनगड आणि खुटटा धुक्यातुन बाहेर पडलेले असल्यामुळे स्पष्ट आणि फारच मनमोहक दिसत होते.दूरवरचे अलंग,मदन,कुलंग सुद्धा उठून आले होते.साम्रद गावातल्याच एका शाळेच्या ओसरीवर ठेपले,कोथिंबीर वड्या,दही,केक असे मस्त जेवण घेतले आणि सांधण च्या आठवणी मनात साठवत ९ वाजता डोंबिवलीला पोहोचलो.

Tuesday, April 5, 2011

आठवणी तुझ्या........

पावसातल्या सातपुलाची

गरमागरम भज्यांची

चिकन आणि सुरमईची

आठवण येते।

लांब हाताच्या शर्टची

हडसरच्या रेकीची

कानातल्या लांब ear ring ची

आठवण येते।

गणपतीतल्या राणीची

वाढदिवसाच्या केकची

बुंदीच्या कळ्यांची

आठवण येते।

लाल रंगाच्या चपलांची

घारया भेदक डोळ्यांची

तुझ्या "अय्या हो का" ची

आठवण येते।

तू रंगवलेल्या गणपतीची

तुझ्या कलरफ़ुल छत्रीची

उसळ आणि पोळीची

आठवण येते।

spanish च्या levels ची

नाकातल्या रिंगची

ठसठशीत ओठांची

आठवण येते।

पहाटे ५.३० ची

गावाहून केलेल्या फोनची

आ वासलेल्या बुटाची

आठवण येते।

तुझ्या विचित्र वागण्याची

तुझ्या मिश्किल हसण्याची

तुझ्या देवभोळेपणाची

आठवण येते।

अशाच आठवणी काढताना

काहीतरी केव्हातरी कुठेतरी

***

तुझी आठवण येते।

Friday, March 25, 2011

पदर गडचा थरार

पदरगड(कलावंतिणीचा महाल)
उंची-६१० मी(२००२ फ़ूट)
जवळचे गाव-खांडस

भीमाशंकर ल़ा कोकणातुन दोन वाटा आहेत.एक आहे गणेश घाट आणि दूसरी शिडी घाट.त्यापैकी गणेश घाटाने जायच्या रस्त्यावर पदरगडाकडे जायची वाट आहे.जीतू आणि वैभव आधीच pilot trek करून आलेले असल्यामुळे रस्ता माहित झाला होता.खांडस ल़ा पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारात गाड्या park केल्या.रोहित मिलिंद अगोदरच येउन पोहोचले होते.आमचा पहिला पड़ाव होता गणेश मंदिर जे २ किमी वर होते.सकाळच्या वेळी खांडस गावातून जायचा आनंद काही वेगळाच होता.साधारण १ १.१५ तासाच्या चालीनंतर आम्ही गणपती मंदिरात पोहोचलो।
गणपती मंदिर छोटेसे आणि कौलारू आहे.मंदिराच्या आवारात बसून इडली चा नाश्ता केला.आणि पुढे पदरगडाच्या वाटेला लागलो।
साधारण ४५ मिनिटांच्या नंतरच्या प्रवासात एक माळरान लागले आणि आम्ही दुसऱ्या पडावाशी पोहोचलो.तो पड़ाव आहे एक विहीर.भीमाशंकर किंवा पदरगडाच्या trek मध्ये ही विहिरच पाण्याचा source आहे.पोटं आणि बाटल्या पाण्याने भरून घेतल्या.येथून पदरगडाकडे जायचा मार्ग वर जंगलात चढतो.हा टप्पा घसारायुक्त,छोट्या कातळ टप्प्यांचा आणि रोमांच आहे.साधारण १ तासाच्या चढणीनंतर आम्ही चिमणीत पोहोचलो.हे पदर गडाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.२ माणसे जेमतेम उभी राहू शकती इतकीच ती जागा आहे.दोन्ही हात आणि पाय यांचा वापर करून वर चढलो.आणि तेथून पदर चा rock patch येतो.patch आहे छोटासाच पण मजा येते चढताना.patch संपला की थोडासा घसारायुक्त मार्ग लागतो आणि आपण पदरगडावर पोहोचतो.वर पोहोचल्यावर एक छोटीशी गुहा लागते.त्या गुहेत विसावा घेतला आणि जेवण सुद्धा.या गुहेशेजारून वर चढायला पायरया आहेत.त्या चढू गेल्यावर आपण पदर गडाच्या पहिल्या भिंतिशी पोहोचतो.या भिंतीच्या डावीकडून पलिकडे गेल्यावर आपण दुसऱ्या भिंतिशी पोहोचतो.या भिंतीच्या पायथ्याशी कडेकडेने exposed route ने आपण मोठ्या गुहेत पोहोचतो.या गुहेतून शिडी वाट,भीमाशंकर चे नागफणी टोक असे विहंगम दृश्य दिसते.

Tuesday, March 15, 2011

Once upon A time in Dombivali

कुम्पणावरून उडी मारली आणि मी "प्रभात पार्क" मध्ये प्रवेशकर्ता झालो.उडी मारली तीच मुळी सीमेंट आणि वाळूत.पक्याच्या दारावरची बेल वाजवली तेव्हा शेजारच्या मद्राशिणीकडे "घरफोड़ी" चालू होती.नितिनने(पक्याचा लहान भाऊ) दरवाजा उघडला आणि आत पाय ठेवताक्षणीच अवेळी "entry" घेतल्याची जाणीव.....छे छे.....पक्की खात्रीच माला झाली.आत शिरतो तोच माझ्या उजव्या हाताला आणि सोफ्याच्या डाव्या हाताला "सोना" बसली होती.माझ्याकडे एक कटाक्ष टाकुन परत ती आपल्या मांडीवर तान्ह्या पोराप्रमाणे घेतलेल्या कागदाच्या बाडावर "रे"घोटायला लागली."सोना" म्हणजे सोनाली.पक्या झुनझुनवाला सोडून MCC मध्ये आला त्या....हो हो त्या दरम्यानच बहुतेक सोनाली च "सोना" झालं असणार! मग पक्याने माझी ओळख तिला पटवून द्यायचा प्रयत्न केला.तो ही कसा तर "अग हाँ.......ह्याला तू ओळखलं असशिलच चेहेरयावरून" आता ओळख अशी का करून द्यायची?नीट सांगायचं की हा अमुक अमुक.त्या १० मिनिटांच्या कालावधीत आम्ही चौघानी बऱ्याच प्रकारचे आव आणण्याचा प्रयत्न केला.त्यात "सोना" न बोलून शहाणी ठरली.मी तिला काहीतरी विचारायचे म्हणून "चित्र बित्र काढत्येस की काय? " असा निरर्थक आणि त्या वेळेला "doesn't required" असा प्रश्न केला.तिने माला तोंडातल्या तोंडात पुटपुटत काहीतरी उत्तर दिले.ते मला समजले आहे असा मी चेहेऱ्यावर भाव आणला.पक्या तिला एकसारखा "ऐ तू आत जा ना" असं का आर्जवत होता हे मात्र उलगडल नाही.मग पक्याने गाण्यांची एक लिस्ट दिली आणि "मी ह्यातल कुठलही गाऊ शकतो" अस उगाचच सांगीतल.मग मीही त्याची परतफेड म्हणून हारमोनियम वर उगाचच सुर काढले।
"सोना पक्या के घर में??" या पक्यारणाच ...ohhh sorry.....प्रकरणाच गूढ़ उकलत "कबाब में हड्डी" न बनता,खोळंबायचं असून सुद्धा नाइलाजास्तव मी आणि नितिन घराबाहेर पडलो आणि रवीच्या रस्त्याला आणि नादाला लागलो.

सत्यघटनेवर आधारित.........इमारती व माणसे यांची नवे बदलली आहेत..........:)

Monday, October 4, 2010

कास पठार,सज्जनगड,ठोसेघर

१८-१९ सप्टेम्बर २०१०

नुकताच गणपतीचा सीझन संपला होता.त्यामुळे विश्रांतीची गरज होती.म्हणून कास ल़ा जायच मनात असूनसुद्धा टाळत होतो.शुक्रवारी नोटीस बोर्डवर नाव पाहिली.त्यात एक नाव होत "मैत्रेयी".लगेच निर्णय घेतला "जायच".मालकाना तस सांगीतल आणि तयारीला सुरुवात केली.२ दिवसांची ट्रिप.त्याला आवश्यक कपडे आणि इतर सामान गोळा कल.आल्याच्या वड्या,आवळे घेतले.सेल चार्ज करायचे होते.पूर्ण दिवस तयारीत गेला.मला ट्रेक च्या आदल्या दिवशी झोप लगत नाही.सर्व रात्र न पाहिलेल्या कास पठाराच स्वप्न बघत काढली.

Monday, July 19, 2010

कातळधार चा धबधबा

१८ जुलै २०१०
२/३ दिवस पावसाचं नाव नाही.धबधबा कोरडा असला तर?उगाच भीती.पण ठरवलं जायचं.१३ जण जमले.९ ज Qualis मधून.२ जण इंद्रायणी ने आणि १ बाइक वरून आणि अभिजित.८ वाजता लोनावला इथे एकत्र जमलो.आणि पुढे निघालो.
कुणे गावाशी आलो.गाड़ी पार्क केली.तिथेच इडलिचा नाश्ता केला आणि पुढे निघालो.राजमाची ल़ा जो रास्ता जातो तय रस्त्यावर एके ठिकाणी एक रस्ता खाली उल्हास vally त उतरतो.या पॉइंट पासून पूर्ण उतारच उतार.फ़क्त उतरत जायचे.वाटेत फ़क्त जंगल आणि जंगल.हे जंगल फसवं आहे.अनेक ठिकाणी रस्ता भरकटू शकतो.वाटेत ठिकठिकाणी मार्गदर्शक दगड ठेवले आहेत.त्यांच्या आधारे २ तासात आपण कातळधार ला पोहोचतो.धबधबा बारीक च होता.त्यामुळे अगदी खालपर्यन्त जाता आले.सगळ्यानी मनसोक्त पोहुन घेतले.तिथेच एका कड्यात निसर्गनिर्मित घळ आहेत.तिथे sandwitch चा आस्वाद घेतला आणि परतीला निघालो.