३० एप्रिलला २७ जणांची jumbo team डोंबिवली हुन रात्री १२ वाजता निघाली.आयत्या वेळी अजय ऐवजी रोशनी आणि महेन्द्र ऐवजी वैभव अशा replacement झाल्या.सुनिल शिंदेला मानगड नंतर ५/६ वर्षांनंतर भेटत होतो.त्यामुळे भरपुर गप्पा मारल्या.त्यामुळे सब बेटे "नाराज" हो गये....:( मित्रा नितेश मला माफ़ कर.अशी चूक मी परत करणार नाही.!!!क
सारा घाटात चहा साठी थांबलो आणि मग पहाटे ५ वाजता घाटघर धरणाजवळ आश्रमशाळेत पोहोचलो.पब्लिक झोपी गेलं आणि मी,प्रणय,निरु आणि सुनील थोडावेळ फ़ेरफ़टका मारला आणि निसर्गाचा आस्वाद घेतला.८ वाजायच्या सुमारास इडलीचा नाश्ता करुन २ किमी वर असलेल्या साम्रद गावात पोहोचलॊ.थोडावेळ फ़ोटो सेशन करुन
सांधणकडे कूच केले.खुट्टा सुळका,रतनगड,अलंग,मदन,कुलंग सगळॆ धुक्यात लपले होते.साधारण ४५ मिनिटे चालल्यानंतर एका तुटलेल्या कड्याच्या टोकाशी पोहोचलो.इथुन सांधण valley च्या बाजुला असलेल्या मिनी कोकणकड्याचे रौद्रभीषण दर्शन घेता येते.आजोबा डोंगर,करोली घाट,सीतेचा पाळणा,रतनगड,खुट्टा सुळका,बाण सुळका यांचे
दर्शन डोळ्यांचे पारणे फ़ेडुन जाते.सगळ्यांनी अगदी झोपुन झोपुन खालच्या valley चे आणि fall चे डोळे गरगरवून टाकणारे दर्शन घेतले.कड्याच्या जवळूनच exposed route वरुन सांधण valley च्या कोकणात उघडणारया तोंडाशी पोहोचलो आणि valley चे वरुन दर्शन घेतले.तिथुन परतुन valley च्या जवळुनच चालत valley च्या तोंडाशी पोहोचलो जिथुन आत प्रवेश करता येतो.सांधण valley हा निसर्गाचा चमत्कार आहे.कातळामध्ये निसर्गनिर्मित एक प्रचंड भेग
तयार झाली आहे. साधारण २०० फ़ूट खोल अशी ही भेग आहे.सुरुवातीला ती १५/२० फ़ूट
आहे आणि मग वाढत जाउन ती १०० फ़ुटापर्यंत open होत जाते.पावसात valley च्या दोन्ही भिंतींवरुन पाणी आत पडते आणि त्यामुळे आतमध्ये पाण्याची pockets तयार होतात.हे पाणी बर्फ़ासारखे थंड असते.आम्हाला अशी २/४ pockets लागली.त्यातल्या एका pocket मधून जावेच लागते.या pocket मध्ये मे महिन्यात सुद्धा छातीभर पाणी होते.या pocket ची लांबी साधारण २०/२५ फ़ूट आहे.पाणी म्हटल्यावर दंगा होणारच आणि तसा तो झाला सु्द्धा.दोन्ही कडयातून सुटलेले कातळकडे आतमधे पडतात त्यामुळे सांधणच्या बेस ला छोट्यामोठया आणि काही अशा दगडगोट्यांचे bed तयार झाले आहे.काही शिलाखंड तर अजस्त्रच आहेत.प्रचंड आकाराच्या या शिलाखंडामधुन वाट काढत काढ
त valley च्या अर्ध्यापर्यंत पोहोचलो.इथुन खाली पुढे जात येते पण अगदी तळाशी गेल्यावर ५० फ़ूट तुटलेला कडा आहे तो रोपनेच उतरता येतो.त्यामुळे तिथेच थांबलो.या ठिकाणी २०/२५ जण बसतील एवढी प्रचंड शिळा आहे त्यावर सर्व जण बसलो आणि त्या valley च्या सौंदर्यात जणुकाही सामवुन गेलो.१५ मिनिटांच्या विश्रांतीनंतर सर्वजण तो १/१.५ किमीचा Bed पार करत बाहेर आलो.valley च्या तोंडाशी पिण्याच्या पाण्याचे छोटेसे pocket आहे तिथे थांबुन पाणी पिउन विसावा घेतला आणि परत निघालो साम्रदकडे.बाहेर पडल्या पडल्या रतनगड आणि खुटटा धुक्यातुन बाहेर पडलेले असल्यामुळे स्पष्ट आणि फारच मनमोहक दिसत होते.दूरवरचे अलंग,मदन,कुलंग सुद्धा उठून आले होते.साम्रद गावातल्याच एका शाळेच्या ओसरीवर ठेपले,कोथिंबीर वड्या,दही,केक असे मस्त जेवण घेतले आणि सांधण च्या आठवणी मनात साठवत ९ वाजता डोंबिवलीला पोहोचलो.
vinay dada jbardast majja aali aani solid Lihlay tu he
ReplyDeletemast ahe sir! vachunach aathvani tajya hotat!
ReplyDelete