Monday, June 15, 2020

Jaipur trip

२२ ते २६ जानेवारी २०१६ या काळात आम्ही जयपूर ट्रीप केली. माझी पहिली मोठी ट्रीप ती सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर होत होती. मला urticaria चा खूप त्रास व्हायचा. बाहेरचे खाणे पिणे मी टाळायचो.अशा अवस्थेत निघताना खूप टेंशन होते.कसे निभावेल याचे.मला दिवसभर rashes येत असत.हाता पायांची आग होत असे.तरीही धाडसाने ठरवले की जायचेच.

२२ जानेवारी ला लोकल ने कुर्ला आणि तिथून टॅक्सी करून बांद्रा टर्मिनस गाठले.हा फोटो तिथला आहे.माझ्या कडे कॅमेरा फोन नव्हता.डिजिटल कॅमेरा ixus 160 होता.त्याने अंदाजाने ही selfi काढलेली. राजस्थान म्हणजे थंडी असेल तसेच ट्रेन मध्ये पण AC असेलया हिशोबाने स्वेटर कानटोपी वगैरे बरीच तयारी घेऊन गेलो होतो.


संध्याकाळचे ७ वाजले होते.आणि गुजरात राज्यात आम्ही दाखल झालो होतो. हा फोटो अशाच एका स्टेशनवर (वापी असेल) घेतला. फोटो मध्ये आहेत सिद्धेश,वरुण आणि नेमाडे. पण पूर्ण ट्रिपमध्ये मी फक्त आणि फक्त नेहल सोबतच राहिलो. बाकीच्या लोकांची नाडी जुळली नाही. त्यांचे विषय वेगळेच होते.ज्यात मला interest नव्हता. मी माझी हौस भागवली.


Monday, August 26, 2019

Mahuli Picnic (GCCE)

गेले काही दिवस चित्त थार्‍यावर नाही. कसलीतरी भीती वाटते. anxiety असते. आईबाबा आणि त्यांचे वागणे-बोलणे हे प्रामुख्याने त्याला जबाबदार आहे.असो. अशा मानसिक अवस्थेत एका mad mad picnic ची अत्यंत गरज होती. ती काल रविवार दि. २५/८/२०१९ ला पूर्ण झाली. माहुली ट्रीपच्या रूपात. काहीही करून मला desperately जायचंच होतं. मी नुसताच जाऊ शकलो नव्हे तर पुर्णपणे मजा करून शकलो. जे फोटो काढायचे होते ते काढू शकलो याचं खूप समाधान आहे. २ गाड्या भरून १०० च्या आसपास मुलं आणि teachers होते. सकाळी ७ वाजता निघालो. आधारवाडी junction वरुन कल्याण-सापे मार्गे तळेले गाठले. तिथे मुंबई-आग्रा national highway ने पडघा वाशिंद करत जोंधळे इंजीनीरिंग कॉलेज वरुन मानस मंदिर रोड मार्गे माहुलीला पोहोचलो. सकाळचे ९ वाजलेले. कृष्णामामा आगीवले यांच्याकडे पोहयांचा नाश्ता केला. त्यानंतर १० वाजता trail ला सुरुवात केली. १२ वाजता trail संपला. मुलांना वनस्पती आणि कीटक यांची माहिती देण्यात आली.  मी जानेवारी २०११ साली माहुली ट्रेकला आलो होतो. त्यानंतर एकदा picnic आणली होती. ट्रेकनंतर ८ वर्षानी आलो. खूप बदल जाणवत होते. नव्याने सर्व-भाविक भक्त निवास बांधण्यात आले आहे. तिथून पुढे माहुलीवरून येणार्‍या प्रवाहांपैकी एक प्रवाह आहे.(19.469648,73.266340) गेले काही दिवस पाऊस नसल्यामुळे त्याला बेताचेच पाणी होते. त्यामुळे मुलांनी त्याच्यात मनसोक्त आनंद घेतला. अक्षराश धुमाकूळ घातला. मुलं आरडाओरडा करत होती. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होती. बुळबुळीत दगडावरून धडाधड पडत होती. छोट्या छोट्या ride तयार झालेल्या वाहत्या पाण्याच्या.त्याच्यात वाहून जाण्याचा आनंद घेत होती. २ तास मनसोक्त डुंबल्यावर भूक लागली. मग परत कृष्णामामा यांच्या घरी जेवण होते. २ भाज्या,पोळ्या, कोशिंबीर, २ गुलाबजाम,आमटी-भात असे साधेसुधे असे जेवण होते. ते झाल्यावर परत फिरायला बाहेर पडलो. जवळच एक quary आहे जी वनखात्याने बंद केली.(19.467826,73.268199) तिथे एक तलाव होता. त्याच्या आसपास timepass केला. ४ वाजले होते. परत कृष्णामामा यांच्या घरी  आलो. मुलांना २/२ वडापाव दिले. परतीच्या प्रवासाला निघालो. येताना बापगाव मार्गे आलो. रात्री ८ वाजता घरी सुखरूप पोहोचलो.
विशेष गोष्टी :
माझ्या ओळखीची फार कमी मुलं होती. तरीही माला जमवून घेण्यात अडचण आली नाही. आदित्य बोटकोंडले,शुभम यमग, ओजस, रिद्धी पाटील, श्रेयसी बापट, रोहित सागवेकर हेच ओळखीचे होते. आदित्य आपल्या गावाचे आणि त्याच्या family मधल्या सगळ्या श्रीमंतीचे वर्णन सांगत होता. he is a fun guy and very much interesting and funny.
quary च्या ठिकाणी आदिती आणि अक्षता आणि अजून ३ जणी ज्यांची नावं देखील माला माहीत नाहीत अशा ५  जणी started talking on various topics and started making lots of fun. अक्षता आणि आदिती यांनी कृष्णामामा यांच्या घरी पोलवर ओळखीम्बे घेतले. माझ्याशी बोबडं बोलत होत्या. ते भारी होतं. एक मुलगी तिच्या आई आणि आजीचे fundae संगत होती. red leggings वाली मुलगी दुसरं असं सांगत होती. एक मुलगी rocks वरून adventure करत होती.
परतातना मुलांना भूतांच्या गोष्टी सांगितल्या.










Friday, June 10, 2011

मी पाहिलेले किल्ले

मी पाहिलेले किल्ले
१ कोरीगड
२ लोहगड
३ तुंग
४ तिकोना
५ घनगड
६ तेलबैला
७ रवळ्या
८ जावळ्या
९ मार्कंडा
१० माणिकगड
११ अलिबाग चा किल्ला
१२ कोर्लई
१३ अर्नाळा
१४ गंभीर गड
१५ भूपत गड
१६ यशवंत गड,रेडी
१७ निवती
१८ सिंधुदुर्ग
१९ विजयदुर्ग
२० भरतगड
२१ भगवंतगड
२२ गोवळकोट
२३ पूर्णगड
२४ रत्नदुर्ग
२५ जयगड
२६ गोपाळगड
२७ जंजिरा
२८ मानगड
२९ चौल्हेर
३० अशेरीगड
३१ तांदुळवाडी
३२ कर्नाळा
३३ सोनगिरी
३४ कोहोज
३५ सुरगड
३६ मृगगड
३७ कामणदुर्ग
३८ निमगिरी
३९ जीवधन
४० बसगड
४१ हरिहर
४२ हर्णे
४३ बाणकोट
४४ कातळधार धबधबा
४५ ठाणाळे लेणी
४६ कलावंतीण सुळका
४७ पेठ
४८ राजगड
४९ शिवनेरी
५० चावंड
५१ यशवंतगड,राजापूर
५२ आंबोळगड
५३ खांदेरी
५४ सोनगिरी,पळसदरी
५५ ईर्शाळगड
५६ मंगळगड
५७ हडसर
५८ ब्रम्हगिरी-दुर्ग भंडार
५९ घोशाळगड
६० बिरवाडी
६१ पारसिक
६२ आजोबा
६३ सोनगड
६४ पर्वतगड
६५ डुबेरगड
६६ तळेग़ड
६७ मांदाड लेणी
६८ सज्जनगड
६९ पद्मदुर्ग
७० नाखिंड
७१ माहुली
७२ अशेरी
७३ पदरगड
७४ गोपाळगड(२८ मे २०११)

Thursday, June 2, 2011

माझी कोकण यात्रा मे २०११

२१ मे
पहाटे ५ ला घर सोडले.NH-17 वर drive करताना जी मजा येते ती काय ती फ़क्त मला आणि रोहितलाच माहीत.महाड माणगाव परिसरात शेतीची कामे चालू होती.थोडेसे फ़ोटॊ काढुन पहिला पडाव गाठला....घोणे काष्ठशिल् संग्रहालय,कोलाड..........रमेश घोणे या कलाकाराने काष्ठशिल्पांच्या सहाय्याने निसर्गाच्या विवि पैलूंचं घडवलेलं दर्शन थक्क करुन टाकतं.निसर्गप्रेमी रसिकांसाठी ही पर्वणीच आहे.१० रु चे माफ़क तिकिट आहे आणि photography मोफ़त आणि मनसोक्त करु शकतो.लाकडापासून बनवलेल्या बाहुल्या,चेहरे,टेलीफोन,table lamps,wall paintings,कासव,मोठा बूट,कुलुप,हत्ती,कंदील अशा वस्तू बघुनच गम्मत वाटते.बाळासाहेब ठाकरे,पु.ल.,येशू यांची शिल्पेही येथे बघायला मिळतात.
दुसरा पडाव होता......उमरठ.....तान्हाजी मालुसरे आणि शेलारमामा समाधी.पोलादपूरपासून किमी वर अंबेनळी घाटाच्या रस्त्याने कापडे फाटा लागतो.इथे डावीकडे वळुन एका घाटरस्त्याने आपण उमरठला पोहोचतॊ.वाटेत डावीकडे सावित्री धरण लागते.सिंहगडावर तान्हाजी मालुसरे यानी देह ठेवल्यावर त्यांचे शव मढ्या घाटाने उमरठला आणण्यात आले आणि तिथे नंतर त्यांची समाधी बांधण्यात आली.उमरठ गावी ग्राम पंचायतीने समाधी स्थळ बांधले आहे.याच ठिकाणी शेजारी जननी कुंभळजा देवीचे मंदिर आहे.येथुन थोडे पुढे गेल्यावर तान्हाजींचा पुतळा बसवलेले ठिकाण आहे.या ठिकाणच्या झाडाच्या ढोलीत काही शस्त्रे सापडली.त्यापैकी काही पुण्याच्या केळकर संग्रहालयात आहेत व २ तलवारी येथील शेजारच्या घरातले रहिवासी रामचंद्र पोकळे(कदम) यांच्याकडे बघायला मिळतात.या ठिकाणी जवळ डोंगरात निसर्गनिर्मित गुहा आहे.पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात येत आहे.या कामी ग्रामपंचायत सदस्य कळंबे यांच्या पुढाकाराने सुषमा स्वराज यानी १५ लाख देणगी दिली अशी पोकळे यानी माहिती दिली.जवळच ढवळे गाव आहे.चंद्रगडाच्या पायथ्याचे हे गाव आहे.पुतळ्याच्या ठिकाणाहून चंद्रगडाचे दर्शन होते.तसेच महाबळेश्वरच्या arthur seat point चे ही दर्शन होते.
तिसरा पडाव होता......कशेडी घाटाच्या माथ्यावरचा अक्कलकोट महाराजांचा मठ........येथुन कशेडी घाटाचे विहंगम दृश्य मन मोहून टाकते.थोडावेळ विश्रांती घेउन आणि थंडगार कोकम सरबताचा आस्वाद घेउन पुढच्या प्रवासाला निघालो.
चौथा पडाव............all time favorite.......श्री देव परशुराम मंदिर,चिपळुण..........यावेळी मंदिराला जायच्या चिपळुण कडच्या प्रवेशद्वाराने निघालो.हा रस्ता मंदिराच्या आवाराजवळ आपल्याला घेउन जातो.देवाचे दर्शन घेउन आणि २ ग्लास सोलकढी घश्याखाली उतरवून पुढे निघालो dream destination कडे................गुहागर............वाटेत रस्त्यावर tp photo session करुन तब्बल १२ तासानी गुहागर गाठले.संध्याकाळी सागर किनारे थोडं photo session करुन रात्री आईबाबांशी गप्पा मारत आणि हापूस आंब्यांवर ताव मारत जेवण केलं आणि झोपेच्या आहारी गेलो.

२२ मे

विश्रांतीचा दिवस.वाडीत आणि समुद्रावर फोटोसेशन करण्यात दिवस घालवला.paddy मामाला फोन करुन २३/२४ मे ची व्यवस्था करुन ठेवली.साधारण plan डोक्यात होता.


२३ मे

पहाटे ६ वाजता निघालो रत्नागिरीकडे.यावेळी राई-भातगाव पुलामार्गे आणि मग आरे-वारे पुलावरुन रत्नागिरी असा बेत ठरवला.रोहिले-तवसाळ भाग बघितला नसल्यामुळे तो बघायचीउत्सुकता होती.पालशेत सोडलं आणि पाउस शिंतडायला सुरुवात झाली.थोडा वेळ एका park केलेल्या रिक्शेत आडोसा घेतला.पाउस लगेच थांबला.पुढे निघालो.थोड्या वेळाने रोहिल्याच्या निसर्गरम्य अशा परिसरात पोहोचलो.संदर असा छोटासा समुद्र्किनारा,समोर जयगडचा जिंदालचा power project आणि सुंदर असा पूल.मनसोक्त फोटो काढले आणि पुढे निघालो.आदल्या रात्री या भागात पाउस झाल्यामुळे रस्ते,डोंगर ओले झाले होते.अशा रस्त्यावरुन फ़ेरफ़टका म्हणजे एक रोमान्सच आहे.काही वेळातच तवसाळच्या माळावर पोहोचलो.इथे थोडे landscapes मारुन तवसाळ गावात निघालो.रस्त्यावरच उजवीकडे विजयगडाचा बुरुज दिसतो.विजयगडाचा मोह आवरुन गावात पोहोचलो आणि पडावाची(बोट) चौकशी केली.एका गावकरयाने "८ वाजता आहे" असे सांगितले.पडाव पलिकडे जयगड गावात जातो असेही सांगितले.एक तास थांबण्यापेक्षा भातगाव पुलावरुनच जावे असे ठरवून परत फ़िरलो भातगावच्या दिशेत.इथे कुडली आणि पडवे अशी गावे लागतात.त्यापैकी पडवे गावातून डिपको मिळतात पण 2 wheelar जाउ शकत नाही तिथपर्यंत.त्यामुळे कुडलीला जायचे ठरवले.तवसाळच्या माळावर कुडली गाव लागते.अत्यंत टुमदार असे हे गाव.landscapes साठी अतिशय संदर ठिकाण.या गावी गवताची "उडवी" बघायला मिळाली.भात झोडपल्यानंतर या उडव्यांमध्ये साठवले जाते.एकेका उडवीत ७००/८०० किलो धान्य राहू शकते.amazed to know this!!ही सर्व माहिती दीपक गडदे यानी उपलब्ध करुन दिली.कोकणात ठिकठिकाणी रस्त्याच्या बाजुला झेंडे खोवलेली ठिकाणे दृष्टीस पडतात.इथे लोक नवस बोलतात.काही दगड रचून त्यात झेंडे उभे करतात.काही ठिकाणी झाडावर झेंडे लावतात.कुडलीत खाली जेट्टीपर्यंत पोहोचलो.पलीकडे समोर कुडली-जांभारी आणि उजवीकडे धाकटी जांभारी अशी गावे दिसतात.या ठिकाणी जयगड खाडी यु टर्न घेते ते स्पष्टपणॆ दिसू शकते.५ मिनिटात आपण पलिकडे पोहोचतो.३० रु तिकिट आहे(bike साठी) आणि डिपको सकाळी ६.१५ ते संध्याकाळी ६.३० चालु असते.अगदी पावसातही.(contact person कन्हैया तरवाला,कुडली(८९७५५९३५७७/8975593577) आरे-वारे पुलावरुन जायचा बेत असल्यामुळे गाडी नेवरे मार्गे रत्नागिरी रस्त्यावर घातली.वाटेत २ गावकरी भेटले.त्याना रत्नगिरी पर्यंत लिफ़्ट दिली.त्यामुळे आरे वारे रस्त्यावर त्यावेळी photo session करता नाही आले.पण त्याच रस्त्याने परतायचे असल्यामुळे निर्धास्त होतो.१० वाजता रत्नागिरीत पद्माकर मामाकडे दाखल झालो.इडलीचा नाश्ता followed by "अतिथी" भोजनालयातले उत्तम जेवण......It was treat.मामा १ मे ला रत्नागिरी दूरदर्शन केंद्रामधून voluntary घेउन retire झाला.त्यामुळे he was free. संध्याकाळी ४.३० ला रत्नदुर्ग पहायला बाहेर पडलो.रत्नदुर्ग अतिशय सुंदर.भगवती मंदिर,नर्मदा सीमेंटची जेटी,कडेलोट point,light house सगळे कसे रम्य.भरपूर फोटो काढुन मग मांडवी बंदरावर पोहोचलो.तिथे भेळ followed by नारळपाणी.once again it was treat.मांडवी बंदर काही मला तितकेसे आवडले नाही.एक तर "चौपाटी" झाली आहे आणि त्यात गर्दी.त्यामुळे जीव घाबराघुबरा होतो.

मामाच्या घराच्या व्हरांड्यात चिमण्या,साधे कावळे,जंगली कावळे,साळुंख्या येत असतात.त्यांचे थोडे फोटॊ काढले.मागच्या फ़णसावर कोकीळ-कोकीळा,बुलबुल वास्तव्य करतात.वर्षातून दोनदा ससाणा येतो.सगळी मज्जाच मज्जा.दिवस मजेत गेला.

Friday, May 6, 2011

माहुलीला घडलेला अप्रिय अपघात

व्यक्तींची नावे बदलली आहेत.प्रसंग खरा अहे.

३१ मे १९९७

"सह्यमित्र" संस्थेचा ग्रुप ट्रेक होता माहुलीला.महेश होता लीडर.महेश आणि ग्रुप शिडीच्या वाटेने वर जाणार होते.महेशच्या काही मित्रानी कल्याण दरवाज्याने वर चढायचे ठरवले.महेशने त्याना विनंती केली की ग्रुप ट्रेकला तुम्ही असं करू नका.इतर वेळी ठीक आहे.पण म्हणतात ना गोष्टी घडायच्या असल्या की घडतातच.एकुण ६ जणानी कल्याण दरवाजा रूट घ्यायचे ठरवले.त्यांच्या मधे एक अगदी नवीन ट्रेकर आणि एक मुलगीही होती.रूट आहे तसा अवघड.जंगलातून वाटा सापडत नाहीत आणि मधे येणारे rock patches त्यामुळे सहसा त्या वाटेने कुणी जात नाहीत.पण...........

प्रकाश आधी महेश लाच join करणार होता.पण काही कारणामुळे त्याला जामले नाही आणि त्याने त्या ६ जणाना join व्हायचे ठरवले.प्रकाश तसा अनुभवी ट्रेकर.या आधी त्याने अलंग मदन कुलंग केले होते आणि काही ट्रेक तर अगदी एकट्याने सुद्धा.ट्रेकला अगदी sleepers सुध्दा घालत असे तो.यावेळीही त्याने sleepers घातल्या होत्या बहुदा.भविष्य बघायचा त्याला छंद होता.का कुणास ठाउक पण तो म्हणत असे "मी अल्पायुषी आहे".गम्मत म्हणुन असेही म्हणे की "मरण यावं तर किल्ल्याच्या सान्निद्ध्यात".

एव्हाना महेश किल्ल्यावर पोहोचला होता.किल्ला सगळा बघुन झाला आणि भटोबा pinnacle च्या बाजुच्या पठारावर चहा चा बेत करण्यात आला.कल्याण दरवाजा जवळपासच असल्यामुळॆ सर्व जण त्या ७ जणांची वाट बघत होते.

प्रकाश आणि इतर ६ जण सकाळी निघाले असावेत बहुतेक.वाटा मिळणे अवघडच जात होते.आणि त्यात ३१ मे चा दिवस.उन नुसते रणरणत होते.तहान तहान होत होते.आणलेले थोडेफ़ार पाणी लगेच संपले होते.कधी एकदा वरच्या ग्रुपला भेटतोय असे प्रत्येकाला वाटत होते.आणि त्यात अगदी नवख्या माणसाला त्या रूट ने आणणे म्हणजे ट्रेक लीडरवर दडपण होतेच.लीडर अर्थातच प्रकाश होता.अनुभवी होता ना तो.सर्व अडथळे पार करत ते ७ जण तुटलेल्या पायरया आहेत तिथपर्यंत येउन पोहोचले.इथे एक अवघड असे एक वळण घ्यावे लागते.patch च्या वर एक टेपाड आहे.त्यावर पिवळे गवत माजले होते.प्रकाश एकटाच मागे राहिला होता कशामुळे तरी.बाकीचे ६ जण कसा बसा तो patch पार करुन कल्याण दरवाज्यात पोहोचले सुद्धा.प्रचंड तहान लागली होती त्याना त्यामुळे वर जायचे त्राण उरले नव्हते.त्यातला एक जण वर चढुन आला महेश कडे आणि सगळ्याना पाणी घेउन परत कल्याण दरवाज्यात गेला.एव्हाना प्रकाश patch जवळ पोहोचला होता.वरुन महेश आणि मित्र त्याला बघु शकत होते.प्रकाश टेपाडापर्यंत पोहोचला.आणि त्याने पिवळ्या गवतावर पाय ठेवला आणि............काही कळायच्या आतच तो त्या गवतावरुन घसरला........इथुन खाली ५०० फ़ूट fall आहे...........महेश ने प्रकाशला कड्यातून निसटताना आणि खाली दरीत कोसळताना पहिले आणि प्रकाश दिसेनासा झाला........महेशच्या पोटात धस्स झाले.पण तो काय समजायचे ते समजुन चुकला होता.कल्याण दरवाज्यातल्या कोणालाही याची जरासुद्धा कल्पना नव्हती.

महेशला आता पटापट निर्णय घ्यायचे होते.घटना समजताच ट्रेक तिथेच cancel करण्यात आला.सर्वजण शिडीच्या वाटेने खाली उतरले.त्याना ट्रेन ने घरी पाठवण्यात आले.आता प्रकाश चा शोध घ्यायचा होता.तो वाचण्याची शक्यताच नव्हती.rescue साठी आणि जर काही कमीजास्त झाले असले तर tyachI body शोधण्यासठी ropes आणि ५/६ climbers ची टीम आणण्यासाठी महेश कल्य़ाण ला पोहोचला.सगळ्याना फ़ोन करण्यात आले.फ़क्त प्रकाशच्या घरी काही कळवण्यात आले नाही.दुसरया दिवशी सकाळी सर्वजण माहुलीला पोहोचले.गावकरी मदतीला घेउन बरयाच प्रयत्नांनंतर प्रकाशचा छिन्नविच्छिन्न झालेला देह त्यांच्या हाती लागला.देह फ़ुगला असल्यामुळे बराच जड झाला होता.कसाबसा तो माहुली खालच्या गावात आणण्यात आला.गावकरी तयार होइनात.त्याना दारु पाजण्यात आल्यानंतरच त्यानी तो खाली आणला होता.तिथुन body शहापूर ला हलवण्यात आली.तिथे तिचे nominal post mortem करण्यात आले आणि नंतर dead body प्रकाश च्या घरी भांडुपला नेण्यात आली.अजुनही शोकांतिकेचा अंत झाला नव्हता.जिल्हा बदलला की death चे पेपर्स verify करावे लागतात त्यामुळे स्मशानात ते विचारण्यात आले.मग राजावाडी hospital मधे जाउन सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर तब्बल ७२ तासांनंतर प्रकाशच्या देहाला अग्नी मिळाला.

आदल्या दिवशी महेशने प्रकाशच्या वडिलाना फ़ोन केला."काका एक अपघात घडलाय प्रकाशला.आपल्याला शहापूरला जायचय." वडील म्हणाले "महेश....खरं काय ते सांग.तो गेलाय का?".....महेश ला काय बोलायचं ते सुचत नव्हत....जड अंत:करणाने तो म्हणाला "हॊ"........काय अवस्था झाली असेल त्या वडिलांची?..........

सर्वच जणांसाठी..........नातेवाईक,मित्र,ट्रेकर्स.....सगळ्यांसाठी अतीशय ह्र्दयद्रावक आणि दु:खद अशी ही घटना घडली.

हा एक अपघात होता.पण तरीही...........

माझी सर्व ट्रेकर्स ना कळकळीची विनंती आहे की या घटनेपासुन बोध घेउन काही मूलभूत नियम जर सर्वांनी पाळले तर अशा घटना टाळता येतील.....

wish U all happy and Safe trekking.........

Life is precious......value it and enjoy..........

Monday, May 2, 2011

सांधण चा फ़ट्टांग ट्रेक

माहुली,अशेरी आणि पदरगडाच्या ट्रेक नंतर एप्रिल महिना उकाड्यामुळे आणि ट्रेक मित्रांच्या वैयक्तिक कारणांमुळे ट्रेक शिवायच गेला।:( त्यामुळे re re shedule करत सांधण valley चा ट्रेक एकदाचा १ मे ला ठरला.पंकजचा blog वाचला होता आणि महिनाभर google map,picassa albums आणि जिथे जिथे माहिती मिलेळ तिथुन भरपुर वाचलं होतं.त्यामुळे सांधण valley त जायची प्रचंड उत्सुकता होती.
३० एप्रिलला २७ जणांची jumbo team डोंबिवली हुन रात्री १२ वाजता निघाली.आयत्या वेळी अजय ऐवजी रोशनी आणि महेन्द्र ऐवजी वैभव अशा replacement झाल्या.सुनिल शिंदेला मानगड नंतर ५/६ वर्षांनंतर भेटत होतो.त्यामुळे भरपुर गप्पा मारल्या.त्यामुळे सब बेटे "नाराज" हो गये....:( मित्रा नितेश मला माफ़ कर.अशी चूक मी परत करणार नाही.!!!कसारा घाटात चहा साठी थांबलो आणि मग पहाटे ५ वाजता घाटघर धरणाजवळ आश्रमशाळेत पोहोचलो.पब्लिक झोपी गेलं आणि मी,प्रणय,निरु आणि सुनील थोडावेळ फ़ेरफ़टका मारला आणि निसर्गाचा आस्वाद घेतला.८ वाजायच्या सुमारास इडलीचा नाश्ता करुन २ किमी वर असलेल्या साम्रद गावात पोहोचलॊ.थोडावेळ फ़ोटो सेशन करुन सांधणकडे कूच केले.खुट्टा सुळका,रतनगड,अलंग,मदन,कुलंग सगळॆ धुक्यात लपले होते.साधारण ४५ मिनिटे चालल्यानंतर एका तुटलेल्या कड्याच्या टोकाशी पोहोचलो.इथुन सांधण valley च्या बाजुला असलेल्या मिनी कोकणकड्याचे रौद्रभीषण दर्शन घेता येते.आजोबा डोंगर,करोली घाट,सीतेचा पाळणा,रतनगड,खुट्टा सुळका,बाण सुळका यांचे दर्शन डोळ्यांचे पारणे फ़ेडुन जाते.सगळ्यांनी अगदी झोपुन झोपुन खालच्या valley चे आणि fall चे डोळे गरगरवून टाकणारे दर्शन घेतले.कड्याच्या जवळूनच exposed route वरुन सांधण valley च्या कोकणात उघडणारया तोंडाशी पोहोचलो आणि valley चे वरुन दर्शन घेतले.तिथुन परतुन valley च्या जवळुनच चालत valley च्या तोंडाशी पोहोचलो जिथुन आत प्रवेश करता येतो.

सांधण valley हा निसर्गाचा चमत्कार आहे.कातळामध्ये निसर्गनिर्मित एक प्रचंड भेग तयार झाली आहे. साधारण २०० फ़ूट खोल अशी ही भेग आहे.सुरुवातीला ती १५/२० फ़ूट आहे आणि मग वाढत जाउन ती १०० फ़ुटापर्यंत open होत जाते.पावसात valley च्या दोन्ही भिंतींवरुन पाणी आत पडते आणि त्यामुळे आतमध्ये पाण्याची pockets तयार होतात.हे पाणी बर्फ़ासारखे थंड असते.आम्हाला अशी २/४ pockets लागली.त्यातल्या एका pocket मधून जावेच लागते.या pocket मध्ये मे महिन्यात सुद्धा छातीभर पाणी होते.या pocket ची लांबी साधारण २०/२५ फ़ूट आहे.पाणी म्हटल्यावर दंगा होणारच आणि तसा तो झाला सु्द्धा.दोन्ही कडयातून सुटलेले कातळकडे आतमधे पडतात त्यामुळे सांधणच्या बेस ला छोट्यामोठया आणि काही अशा दगडगोट्यांचे bed तयार झाले आहे.काही शिलाखंड तर अजस्त्रच आहेत.प्रचंड आकाराच्या या शिलाखंडामधुन वाट काढत काढ valley च्या अर्ध्यापर्यंत पोहोचलो.इथुन खाली पुढे जात येते पण अगदी तळाशी गेल्यावर ५० फ़ूट तुटलेला कडा आहे तो रोपनेच उतरता येतो.त्यामुळे तिथेच थांबलो.या ठिकाणी २०/२५ जण बसतील एवढी प्रचंड शिळा आहे त्यावर सर्व जण बसलो आणि त्या valley च्या सौंदर्यात जणुकाही सामवुन गेलो.१५ मिनिटांच्या विश्रांतीनंतर सर्वजण तो १/१.५ किमीचा Bed पार करत बाहेर आलो.valley च्या तोंडाशी पिण्याच्या पाण्याचे छोटेसे pocket आहे तिथे थांबुन पाणी पिउन विसावा घेतला आणि परत निघालो साम्रदकडे.बाहेर पडल्या पडल्या रतनगड आणि खुटटा धुक्यातुन बाहेर पडलेले असल्यामुळे स्पष्ट आणि फारच मनमोहक दिसत होते.दूरवरचे अलंग,मदन,कुलंग सुद्धा उठून आले होते.साम्रद गावातल्याच एका शाळेच्या ओसरीवर ठेपले,कोथिंबीर वड्या,दही,केक असे मस्त जेवण घेतले आणि सांधण च्या आठवणी मनात साठवत ९ वाजता डोंबिवलीला पोहोचलो.

Tuesday, April 5, 2011

आठवणी तुझ्या........

पावसातल्या सातपुलाची

गरमागरम भज्यांची

चिकन आणि सुरमईची

आठवण येते।

लांब हाताच्या शर्टची

हडसरच्या रेकीची

कानातल्या लांब ear ring ची

आठवण येते।

गणपतीतल्या राणीची

वाढदिवसाच्या केकची

बुंदीच्या कळ्यांची

आठवण येते।

लाल रंगाच्या चपलांची

घारया भेदक डोळ्यांची

तुझ्या "अय्या हो का" ची

आठवण येते।

तू रंगवलेल्या गणपतीची

तुझ्या कलरफ़ुल छत्रीची

उसळ आणि पोळीची

आठवण येते।

spanish च्या levels ची

नाकातल्या रिंगची

ठसठशीत ओठांची

आठवण येते।

पहाटे ५.३० ची

गावाहून केलेल्या फोनची

आ वासलेल्या बुटाची

आठवण येते।

तुझ्या विचित्र वागण्याची

तुझ्या मिश्किल हसण्याची

तुझ्या देवभोळेपणाची

आठवण येते।

अशाच आठवणी काढताना

काहीतरी केव्हातरी कुठेतरी

***

तुझी आठवण येते।